प्रसिद्ध कॉमेडियनचं ट्विट का होतंय व्हायरलं?, ‘तो’ व्हिडीओ आणि भाजपवरील टीकेचा अर्थ काय?

| Updated on: Nov 08, 2023 | 2:36 PM

योगी राज्यात महिलांना भर रस्त्यात... प्रसिद्ध कॉमेडियनने साधला भाजपवर निशाणा... एका प्रसिद्ध कॉमेडियनने भाजपवर निशाणा साधला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे... कॉमेडियनने पोस्ट केलेला व्हिडीओ सर्वत्र चर्चेत...

प्रसिद्ध कॉमेडियनचं ट्विट का होतंय व्हायरलं?, तो व्हिडीओ आणि भाजपवरील टीकेचा अर्थ काय?
Follow us on

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : एका प्रसिद्ध कॉमेडियनने भाजपवर निशाणा साधला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. इमर्जन्सी नंबर डायल 112 सेवेत कंत्राटावर नियुक्त केलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी लखनऊमध्ये निदर्शनं केली. यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाल. कंत्राटावर नियुक्ती झालेल्या महिलांनी पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी लखनऊ आणि गाझियाबादमध्ये आंदोलन केलं. आंदोलना दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी महिलांची समज काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलनावर ठाम असलेल्या महिलांना माघार घेतली नाही. वीजपुरवठा खंडित होऊनही महिली आपल्या मागण्या मान्य करण्यावर ठाम राहिल्या. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना वाटेत अडवून ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

व्हिडीओमध्ये पोलीस आणि महिला कर्मचाऱ्यांमध्ये होत असलेली झटापट दिसत आहे. सर्वत्र व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कॉमेडियन राजीव निगन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर, कॉमेडियनने भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.

राजीव निगम ट्विटमध्ये काय म्हणाला?

राजीव निगम ट्विट करत म्हणाला, ‘महिलांसाठो मोठ्या – मोठ्या गोष्टी करतील. महिला सम्मान आणि स्त्रीशक्तीची पूजा… असे ढोंग ते निर्माण करतात. पण प्रत्यक्षात महिलांनी त्यांच्या हक्काची मागणी केल्यानतंर, त्यांना अशा प्रकारे अपमानित केलं जातं, मारहाण केली जाते, हे पहिल्यांदाच घडलं आहे असे नाही. उत्तर प्रदेशात माहीलांसोबत असंच घडतं..’ सध्या राजीव निगम याचं ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

राजीव निगम ट्विटवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

राजीव निगम याने पोस्ट केलेल्या ट्विटवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ते फक्त बोलण्यात माहिर आहेत… मणिपूर, महिला खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून तुम्हाला कळू शकेल की शब्द आणि कृतीमध्ये किती फरक आहे.’ अनेकांनी संताप व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.