दीपिका पादुकोण प्रेग्नंट, लोकांनी थेट दिल्या कपिल शर्माला शुभेच्छा, अखेर..

| Updated on: Feb 29, 2024 | 1:18 PM

Deepika Padukone Pregnant : अभिनेत्री दीपिका पादुकोण ही चांगलीच चर्चेत आलीये. दीपिका पादुकोण ही गेल्या काही दिवसांपासून पार्ट्यांपासून दूर आहे. दीपिका पादुकोण ही प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा ही सातत्याने रंगताना दिसली. आता शेवटी याबद्दलची मोठी घोषणा ही करण्यात आलीये. दीपिका पादुकोण ही प्रेग्नंट आहे.

दीपिका पादुकोण प्रेग्नंट, लोकांनी थेट दिल्या कपिल शर्माला शुभेच्छा, अखेर..
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण ही चांगलीच चर्चेत आहे. अनेक पार्ट्या आणि शोपासून दीपिका पादुकोण ही गायब दिसली. दीपिका पादुकोण ही प्रेग्नंट असल्याची चर्चा सातत्याने रंगत होती. मात्र, यावर रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी बोलणे टाळलेच. शेवटी आता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी मोठी घोषणा केलीये. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे 2024 मध्ये त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगितले.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या या पोस्टनंतर शुभेच्छांचा वर्षाव हा त्यांच्यावर होताना दिसतोय. हेच नाही तर चाहत्यांसोबतच बाॅलिवूड कलाकारांनी देखील रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका पादुकोण ही बाळाला सप्टेंबर 2024 मध्ये जन्म देणार असल्याचे देखील पोस्टमधून सांगण्यात आलंय.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या या घोषणेनंतर चक्क कपिल शर्मा याचे नाव आता चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. एकीकडे लोक रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांना शुभेच्छा देत आहेत तर दुसरीकडे चक्क कपिल शर्मा याला देखील शुभेच्छा देत आहेत. कपिल शर्मा मामा बनणार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

थेट काही लोक हे कपिल शर्मा यालाच शुभेच्छा देताना दिसत आहेत. एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट करत म्हटले की, जर तुम्हाला मुलगा झाला तर मुलाचे नाव हे दीपवीर ठेवा. दुसऱ्याने म्हटले की, बाळ रणवीर सिंह याच्यासारखेच हवे. दीपिका पादुकोण हिच्या प्रेग्नंसीबद्दल कळाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्साह हा बघायला मिळतोय.

सोनू सूद, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, आयुष्मान खुराना, नीना गुप्ता, अनुपम खेर, मनीष मल्होत्रा, वरुण धवन यांनी पोस्टवर कमेंट करत रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांना शुभेच्छा या दिल्या आहेत. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट ही चांगलीच व्हायरल होताना देखील दिसत आहे.

दीपिका पादुकोण ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. आता दीपिका पादुकोण ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे.