दीपिका पादुकोण प्रेग्नंट! अभिनेत्री दिसली बेबी बंप लपवताना, अभिनेत्रीचे ‘ते’ फोटो तूफान व्हायरल

| Updated on: Feb 20, 2024 | 7:35 PM

Deepika Padukone Pregnant : अभिनेत्री दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत असते. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट जोरदार धमाका देखील करत आहेत.

दीपिका पादुकोण प्रेग्नंट! अभिनेत्री दिसली बेबी बंप लपवताना, अभिनेत्रीचे ते फोटो तूफान व्हायरल
Follow us on

मुंबई : दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट मोठा धमाका करताना दिसले. दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी शाहरूख खान याच्या बंगल्या शेजारीच आलिशान असे घर खरेदी केल्याचे सांगितले गेले. विशेष म्हणजे या घराची किंमत कोट्यवधी असल्याचे देखील सांगितले गेले.

आता नुकताच दीपिका पादुकोण हिच्याबद्दल मोठी बातमी येताना दिसतंय. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे लवकरच आई बाबा होणार आहेत. दीपिका पादुकोण ही प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा आहे. अजून जरी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी यावर काही भाष्य केले नसले तरीही यांच्या अत्यंत जवळच्याकडून हे सांगण्यात आलंय की, दीपिका पादुकोण हे प्रेग्नंट आहे.

दीपिका पादुकोण ही चार महिन्यांची प्रेग्नंट असल्याचे देखील सांगितले जाते. नुकताच दीपिका पादुकोण ही डिझायनर साडीमध्ये दिसलीये. यावेळी दीपिका पादुकोण हिचा जबरदस्त लूक दिसतोय. मात्र, या फोटोंमध्ये दीपिका पादुकोण ही बेबी बंप लपवताना दिसत आहे. हेच फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला आता 5 वर्षे झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत दीपिका पादुकोण हिच्या प्रेग्नंसीबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. आता यामध्ये जवळपास हे खरे आहे की, दीपिका पादुकोण ही प्रेग्नंट आहे. आता दीपिका पादुकोण हिच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद हा बघायला मिळतोय.

बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली. वरुण धवन याची पत्नी नताशा ही प्रेग्नंट आहे. नताशा आणि वरुण धवन यांच्या घरी देखील लवकरच पाळणा हलणार आहे. वरुण धवन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची घोषणा केली. वरुण धवन याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसली.