Dipika Kakar : थेरेपीचा दुष्परिणाम, वजन कमी झालं…दीपिका करतेय कॅन्सरचा सामना, पतीनं दिली हेल्थ अपडेट
Dipika Kakar Health Update : दीपिका कक्कर गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरचा सामना करत असून अभिनेत्रीच्या पतीनं हेल्थ अपडेट दिली आहे.

अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या दोन वर्षांपासून लिव्हरच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. तिचं वजन खूप कमी झालं आहे, आणि तिचा पती शोएब इब्राहिमनं सांगितलं की, हे इम्युनोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे झालं आहे.
नुकत्याच एका यूट्यूब व्लॉगमध्ये, शोएबने दीपिकाच्या आरोग्याबद्दलच्या चिंता दूर केल्या. आणि खोटे फोटो व्हायरल करणाऱ्यांना इशाराही दिला आहे.
शोएबनं सांगितलं की, 'वजन कमी होणं हा इम्युनोथेरेपीचा एक दुष्परिणाम आहे. यात व्यक्ती काही खाऊ शकत नाही आणि सतत मळमळल्यासारखे वाटतं. दर दोन दिवसांनी दीपिकाला उलटी होते. जे लोक इम्युनोथेरेपी किंवा कीमोथेरेपी घेतात, त्यांचे शरीर अत्यंत कमजोर होऊन जाते.'
दीपिकानं सांगितलं की, सुरुवातीला तिनं डाएट करून ५-६ किलो वजन कमी केलं होतं, परंतु गेल्या दीड महिन्यात जे वजन कमी झालं आहे, ते पूर्णपणे इम्युनोथेरेपीच्या साईड इफेक्ट्समुळे झालं आहे.
म्हणाला