भूमिकेसाठी अभिनेत्यांचे निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध…बॉलिवूडबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक दावा
Director On Male Casting Couch : दिग्दर्शक राहत शाह काझमीनं बॉलिवूडबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

बॉलिवूड असो वा दाक्षिणात्य इंडस्ट्री, कास्टिंग काऊचचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अनेक अभिनेत्री याबद्दल उघडपणे भाष्य करतात. अशातच आता निर्माता राहत शाह काझमीनं अभिनेत्यांच्या कास्टिंग काऊचबद्दल भाष्य केलं आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राहत म्हणाला की, 'आजही कास्टिंग काऊच आहे. ज्या काही लहान-सहान कास्टिंग एजन्सी आहेत, त्या अशा मागण्या करतात.'
'अभिनेत्रींचं अनेक प्रकारचं शोषण केलं जातं. इंडस्ट्रीत वैयक्तिकरित्या शोषण होतं. पण, आजकाल याबद्दलची जाणीव अनेकांना आहे.'
भूमिकेसाठी अभिनेते निर्मात्यांसोबत किंवा दिग्दर्शकांसोबत शारीरिक संबंध ठेवतात का? असं विचारलं असता राहत म्हणाला की, 'हो..आणि आजकाल याबद्दल सर्वांना माहित आहे.'
'काही वेळेस अभिनेत्यांचं शोषण होतं, तर काही वेळेस ते स्वतः प्रसिद्धीसाठी हे सगळं करायला तयार असतात. ज्यांना मेहनत घ्यायची नसते, ते करतात.' असंही राहत शेवटी म्हणाला.