
ये रिश्ता क्या कहलाता है फेम करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा यांच्यात वाद निर्माण झाल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत, मात्र आता त्याला घरगुती वादात अटक करण्यात आली होती. रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये राहिल्यानंतर आता त्याला जामीन मिळाला आहे.

मुंबई पोलिसांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, ते सध्या अभिनेत्याशी बोलत आहेत. अभिनेता करण आणि निशा यांच्या नात्यातील तणावाच्या बातम्या मागील बर्याच काळापासून कानावर येत आहेत, पण आता असं दिसून येत आहे की ही समस्या बरीच वाढली आहे.

हे जोडपे किसिंग फोटो शेअर करण्यास मागेपुढे पाहत नव्हतं. आता या दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

करण आणि निशाने 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं, दोघांनीही अगदी सोप्या पद्धतीने सात फेरे घेतले होते.

करणने निशाला मीडियासमोर प्रपोज केले होतं, यादरम्यान दोघांचीही रोमँटिक स्टाईल चाहत्यांनी पाहिली होती.

दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते आणि त्यांचे फोटोसुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.