Drishyam 3 box office collection : बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 3’ चीच हवा! ‘नई नवेली’ आणि ‘प्रहार’ मध्ये बॉक्स ऑफिसवर टिकण्यासाठी धडपड
अजय देवगणच्या 'दृश्यम ३' ने ३६५ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर आपले एकहाती वर्चस्व राखले आहे. नव्या चित्रपटांच्या स्पर्धेतही आपली पकड मजबूत ठेवली आहे. तर ललित प्रभाकरच्या 'प्रहार' चित्रपटाला आणि आदिनाथ कोठारेच्या 'नई नवेली' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.

बॉक्स ऑफिसवर सध्या चित्रपटांची चांगलीच स्पर्धा रंगली आहे. अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ ने आधीच दमदार कमाई करत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. त्यात 16 ऑक्टोबरला विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची ‘रणबाली’ यामी गौतमीची ‘नई नवेली’ आणि ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ हे 3 चित्रपट प्रदर्शित झाले. आता या चित्रपटांच्या कमाईची तुलना सुरू असून कोणता चित्रपट किती गल्ला जमतोय, याची उत्सुकता लागली आहे.
दृश्यम 3 अजूनही शर्यतीत पुढे
अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ ने या नव्या चित्रपटांच्या स्पर्धेतही आपली पकड कायम ठेवली आहे. 24 ऑक्टोबरला चित्रपटाने अंदाजे 2.65 कोटी रूपयांची कमाई केली. भारतातील एकूण निव्वळ कमाई सुमारे 365.90 कोटी रूपयांवर पोहोचल्याचा अंदाज आहे.
ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’ ची कमाई पहिल्यापासून ढासळली
ललित प्रभाकर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रहार’ या चित्रपटाची सुरूवात 2.35 कोटीने झाली होती. चित्रपटात सरकारी वकील ‘उज्वल निकम’ यांच्या आयुष्यावर आधारित खटल्यावर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. 24 ऑक्टोबरला चित्रपटाने अंदाजे 1.15 कोटी कमावले. त्यानंतर भारतातील एकूण कमाई 18.90 कोटी झाली आहे.
आदिनाथ कोठारेच्या ‘नई नवेली’ ला कसा प्रतिसाद मिळतोय?
आदिनाथ कोठारे आणि यामी गौतमच्या ‘नई नवेली’ या हॉरर – कॉमेडी चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.25 कोटी रूपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या नवव्या दिवशी कमाईत मोठी घट झाल्याचं दिसलं. २४ ऑक्टोबरला चित्रपटाने अंदाजे 95 लाख रूपये कमावले. यासह भारतातील कमाई सुमारे 23.70 कोटी रूपये झाली आहे.
‘रणबाली’ ची कमाई किती?
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘रणबाली’ने पहिल्या दिवशी 9.25 कोटी रूपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या 9 व्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला या सिनेमाने अंदाजे 2.80 कोटी रूपये कमावल्याची माहिती समोर आली आहे. यासह भारतातील कमाई सुमारे 50.10 कोटी रूपयांवर पोहोचली आहे.
एकूण आकडे पाहता ‘दृश्यम 3’ ची कमाई इतर तीन चित्रपटांपेक्षा खूपच पुढे आहे. रणबाली नेही 50 कोटींचा टप्पा गाठला आहे, तर ‘नई नवेली’ आणि प्रहार बॉक्स ऑफिसवर टिकण्यासाठी गटांगळ्या खात आहेत. हे बॉक्स ऑफिसचे आकडे विविध ट्रेड रिपोर्ट्सवर आधारित अंदाज आहेत. अंतिम आकडे बदलू शकतात