सनी लिओनीच्या 5 वर्षांच्या लेकीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक, पाहा निशानं नेमकं काय केलं…

| Updated on: Apr 23, 2021 | 10:14 AM

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आपल्या तीनही मुलांवर खूप प्रेम करते. यासह तिने प्रत्येकाचे खूप चांगले संगोपन केले आहे, ज्याचा पुरावा आपण या नवीन व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

सनी लिओनीच्या 5 वर्षांच्या लेकीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक, पाहा निशानं नेमकं काय केलं...
सनी लिओनी आणि परिवार
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आपल्या तीनही मुलांवर खूप प्रेम करते. यासह तिने प्रत्येकाचे खूप चांगले संगोपन केले आहे, ज्याचा पुरावा आपण या नवीन व्हिडीओमध्ये पाहू शकतो. वास्तविक, सनीचा पती डॅनियल वेबर अलीकडेच तिन्ही मुलांबरोबर विमानतळावर स्पॉट झाला होता. यादरम्यान त्यांची लेक निशा (Nisha) हीने असे काही केले की, सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे (Fans praising Sunny Leone daughter nisha on social media).

वास्तविक, जेव्हा डॅनियल तीन मुलांना कारमधून बाहेर घेऊन येतो, तेव्हा तो एका हाताने निशा आणि दुसऱ्या हाताने मुलाला धरतो. नेमका त्याचवेळी त्याचा दुसरा मुलगा पटकन पुढे जाऊ लागतो, तेव्हा मोठी बहिण या नात्याने निशा त्याचा हात धरते आणि त्याला आपल्याबरोबर उभे करते. यानंतर, ती तिचा मास्क व्यवस्थित करते आणि तिच्या भावाचा हात पकडून उभी राहते.

चिमुकल्या निशाला न कळत्या वयातही मोठ्या माणसाप्रमाणे आपले कर्तव्य करताना पाहून सर्वजण व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये तिचे खूप कौतुक करत आहेत. निशा आपल्या भावांची किती काळजी घेते, याबद्दल चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. कुणी म्हटले की, निशा चांगली मोठी बहीण आहे, तर कोणी कमेंट करत ​​आहे की, सनी आणि डॅनियलनी निशाला चांगले संस्कार दिले आहेत.

पाहा निशाचा व्हिडीओ

सनी आणि डॅनियल दोघेही आपल्या मुलांची पूर्ण काळजी घेतात. दोघेही काम आणि मुले यांना दिला जाणारा वेळ नीट व्यवस्थापित करतात. त्या दोघांपैकी एक नेहमीच मुलांसमवेत असावा, असा त्यांचा प्रयत्न असतो. एवढेच नाही तर दोघेही कामातून विश्रांती घेतात आणि मुलांबरोबर सहलीलाही जातात. मुलांचा वाढदिवस असो किंवा कोणताही उत्सव असो, संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे तो साजरा करतात (Fans praising Sunny Leone daughter nisha on social media).

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सनीच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, ती लवकरच ‘शीरो’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ‘शिरो’ हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे आणि 4 भाषांमध्ये अर्थात तामिळ, हिंदी, तेलगू आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा टीझर

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, आता टीझरनंतर चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. याशिवाय सनी ‘हेलन’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. हिंदी चित्रपटांशिवाय सनी काही तेलगू चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

(Fans praising Sunny Leone daughter nisha on social media)

हेही वाचा :

PHOTO | घरीच राहून सोनाक्षी सिन्हाने घटवले वजन, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही झाले चकित!

Video | ‘रॉकस्टार आशाताई’, हृतिक रोशनच्या गाण्यावर आशा भोसलेंनी धरला ठेका! पाहा व्हिडीओ