PHOTO | घरीच राहून सोनाक्षी सिन्हाने घटवले वजन, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही झाले चकित!

सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर तिच्या वर्कआउटचे काही फोटो शेअर केले आहेत, हे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हाचे (Sonakshi Sinha) ट्रांसफॉर्मेशन स्पष्टपणे दिसत आहे, यासाठी फॅन्स तिचे खूप कौतुक करीत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:44 PM, 22 Apr 2021
1/7
सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर तिच्या वर्कआउटचे काही फोटो शेअर केले आहेत, हे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हाचे (Sonakshi Sinha) ट्रांसफॉर्मेशन स्पष्टपणे दिसत आहे, यासाठी फॅन्स तिचे खूप कौतुक करीत आहेत.
2/7
सोनाक्षी सिन्हाने हे फोटो घरी कसरत करत असतानाचे आहेत "जेव्हा #WFH मुळे तुम्ही घरातूनच वर्कआऊट करता.", असे कॅप्शन ता फोटोला दिले आहे. चाहते या फोटोंवर फायर इमोजी वापरत कमेंट करत आहेत.
3/7
चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोनाक्षीचे कौतुक केले. फोटोवर करताना करताना धर्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता यांनी लिहिले की, ‘आपण पूर्णपणे भिन्न दिसत आहात यावर माझा विश्वासच बसत नाहीय.’ तर नम्रता पुरोहित यांनी लिहिले की, किलिंग इट.
4/7
पूर्वीच्या वजन वाढल्यामुळे सोनाक्षी सिन्हाने बर्‍याच वेळा ट्रोलर्सचा सामना केला आहे. फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन खूप जास्त होते. पदार्पणापूर्वी तिने तब्बल 30 किलो वजन कमी केले होते.
5/7
सोनाक्षी सिन्हाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती शाळेत असताना 95 किलो वजनाची होती आणि त्यामुळे सगळे तिला चिडवत असत. मात्र तिने इतरांनी दिलेला त्रास कधी लक्षात ठेवला नाही.
6/7
सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली, या गोष्टींमुळे मी स्वत:ला खाली पडू दिले नाही. कारण मला माहित होतं की माझ्या वजनापेक्षा आयुष्यात आणखी बरेच काही महत्त्वाचे आहे.
7/7
मात्र, सोनाक्षीचा हा नवा फिट अवतार पाहून तिचे चाहते मात्र भलतेच खुश झाले आहेत. अनेकांनी तिचे तोंडभरून कौतुक केले आहे.