AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरे व्यापारी नाही मग आता मलायका कोणाच्या मिठीत? नव्या मिस्ट्री मॅनसोबत व्हिडीओ तुफान व्हायरल

Malaika Arora With Mystery Man: अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील एक मिस्ट्री मॅनसोबत तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत... ज्यावर अनेकांना कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत...

हिरे व्यापारी नाही मग आता मलायका कोणाच्या मिठीत? नव्या मिस्ट्री मॅनसोबत व्हिडीओ तुफान व्हायरल
अभिनेत्री मलायका अरोरा
| Updated on: Mar 09, 2026 | 2:30 PM
Share

Malaika Arora With Mystery Man: अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका हिरे व्यापारी हर्ष मेहता याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला. दोघांचे रोम येथील फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले. आता पुन्हा मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मलायका हिचा एका मिस्ट्री मॅनसोबत व्हिडीओ व्हायरल होत आहे… ज्यामध्ये दोघे डान्स करताना दिसत आहेत… दोघांना एकत्र डान्स करताना पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे…

रविवारी संध्याकाळी मलायका अरोराने तिच्या नवीन रेस्टॉरंटसाठी लाँच पार्टीचे आयोजन केलं होतं, ज्यामध्ये अनेक लोक उपस्थित होते. पार्टीमधून मलायकाचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये ती एका पुरूषासोबत नाचताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्य म्हणजे, तो पुरुष हर्ष नाही तर, दुसराच कोणी आहे… ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

मिस्ट्री मॅनसोबत मलायका…

व्हिडीओमध्ये मलायका हिच्यासोबत दिसणार पुरुष दुसरा तिसरा कोणी नाही तर, स्पिलिट्सविला कंटेस्टेंट सोराब बेदी आहे… त्यांची केमिस्ट्री पाहून लोक अंदाज लावू लागले की सोराब हा मलायकाचा बॉयफ्रेंड आहे का. पण सत्य वेगळं आहे. प्रत्यक्षात सोराब आणि मलायकामध्ये कोणतेही प्रेमसंबंध नाहीत.

सोराबने मलायकाच्या नवीन रेस्टॉरंट “स्वीनी बॉम्बे” च्या लाँच पार्टीलाच हजेरी लावली होती. सोराबने त्याच्या इंस्टाग्रामवर पार्टीचे फोटो शेअर करत मलायकाचं अभिनंदन केलं. यावरून हे स्पष्ट होत आहे की, दोघे फक्त मित्र आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्टीमध्ये मलायकाचा बॉयफ्रेंड हर्ष मेहता देखील होता… मलायका आणि हर्ष दोघे एकत्र घराबाहेर निघाले आणि एकाच गाडीच बसताना देखील दिसले… सांगायचं झालं तर, मलायका आणि हर्ष यांच्या मध्ये 19 वर्षांचं अंतर आहे. मलायका 52 वर्षांची आहे तर, हर्ष 33 वर्षांचा आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत