राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पूरसंकट कायम आहे. इंद्रावती, पामूला गौतम आणि पर्लकोटा या नद्यांना आलेल्या पुरामुळे सुमारे २५० घरे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, १०० गावांचा संपर्क तुटला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पूरपरिस्थिती कायम आहे. इंद्रावती, पामूला गौतम आणि पर्लकोटा या तीन प्रमुख नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे परिसरातील सुमारे २५० घरे पाण्याखाली गेली असून, ५२५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, छत्तीसगड राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका या नद्यांना बसला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यात पूरसंकट कायम आहे. दृश्यांमध्ये भामरागड पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मार्ग बंद केल्याचे दिसून येत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधी फलक लावले आहेत.
इंद्रावती नदी, पर्लकोटा आणि पामूला गौतम पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरात आलेल्या या पुरामुळे १०० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे. सध्याही पूरस्थिती कायम असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Sep 27, 2026 03:11 PM
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...

