AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?

| Updated on: Sep 27, 2026 | 3:28 PM
Share

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई विमानतळावर लँड जिहादचा गंभीर आरोप केला आहे. विमानतळाच्या जागेवर अनधिकृत मशीद बांधली गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोमय्यांनी यावर तोडक कारवाईचा इशारा दिला असून, सुरक्षा-संवेदनशील क्षेत्रात झालेल्या या बांधकामाची फॉरेन्सिक चौकशी करण्याची मागणी विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई विमानतळावर लँड जिहाद झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. विमानतळाच्या जागेवर अनधिकृत मशीद बांधण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. या बांधकामावर तात्काळ तोडक कारवाई करण्यात यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोमय्या यांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, हे बांधकाम सुरक्षा-संवेदनशील क्षेत्राच्या १०० मीटरच्या आत झाले आहे, त्यामुळे यामागे टेरर अँगल आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्यांनी स्पष्ट केले.

विमानतळ प्राधिकरणाने मुंबई विमानतळ कंपनीला (MIAL) लीजवर दिलेल्या जागांचा उपयोग कसा झाला, याबाबत फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे. या आरोपामुळे मुंबई विमानतळाभोवती एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

Published on: Sep 27, 2026 03:27 PM

Follow Us