AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : व्ही. के सिंगला धरलं तर अनेक नावं समोर येतील.. अजित पवार विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक

अजित पवारांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघातामागे घातपात असल्याची शंका व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. व्हिएसआर कंपनी आणि व्ही.के. सिंग यांना वाचवले जात असल्याचा आरोप करत, अपघातावेळी कमी दृश्यमानता असतानाही विमानाने उड्डाण का केले, यावरही त्यांनी बोट ठेवले आहे.

Rohit Pawar : व्ही. के सिंगला धरलं तर अनेक नावं समोर येतील..  अजित पवार विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक
| Updated on: Mar 09, 2026 | 2:15 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे.28 जानेवारीला व्हीएसआर कंपनीच्या विमानाला बारामतीजवळ अपघात झाला आणि त्यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातावरून संशय व्यक्त करत अजित पवारांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या महिन्याबरापासून ते या विषयावर विविध सवाल उपस्थित करत असून हा अपघाता आहे की घातपाता याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. तसेच या प्रकरणात व्हिएसआर कंपनी, तिचा मालक यांना जी सूट मिळत्ये त्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. आज रोहित पवार यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत अनक सवाल उपस्थित केले. गेल्या काही दिवसांपासून ते देशातील विविध नेत्यांची भेट घेत असून आज ते सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी व्हीएसआर कंपनीबद्दलही काही प्रश्न, शंका उपस्थित केल्या.

रोहित पवारांचं म्हणणं काय ?

अपघाताच्या दिवशी व्हिजीबिलीटी कमी होती, 3000 इतकी, तेव्हा विमानाचे कॅप्टन कपूर यांनी व्ही.के सिंग यांना फोन करून सांगितलं होतं की व्हिजीबिलीटी खराब आहे, आत्ता आम्ही टेक ऑफ करू शकत नाही. मात्र तेव्हा व्ही. के सिंगनी त्याला सांगितलं की तू टेकऑफ कर, बाकीचं मी नंतर पाहीन, असा दावा रोहित पवार यांनी केला. हे मी जे बोलतोय त्याचा पुरावा म्हणजे, सिंगचे सीडीआर काढून त्यात काय संभाषण झालं ते तपासता येऊ शकतं. कपूर हा पायलट होता, अपघाताच्या दिवशी त्यांच्या रक्तात कुठेही ड्रग्स, दारू , विषंही नव्हतं. काही दारू न पिता सुद्धा, त्याने जे केलं ते का केलं असेल, त्याच्या खोलात जावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले. त्याच्यावर काही दबाव होता का , व्ही के सिंग यांना का वाचवलं जात आहे, असा सवालही सर्वांच्या मनात आहे.

मला व्ही. के सिंग किंवा व्हीएसआरशी घेणं देण नाही, पण अजित दादा जेव्हा विमानात होते, तेव्हा ते विमान पडलं की ते पाडण्यात आलं ? हाच माझा प्रश्न असून त्याची उत्तर हवी आहेत. व्ही के सिंग आणि व्हीएसआरला वाचवलं जातं आहे, या विधानाचा रोहित पवार यांनी पुनरुच्चार केला. कारण व्ही. के सिंगला जर ताब्यात घेतलं, तर तो काही लोकांची नावं घेईल,  अशी त्यांना भीती आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी