अनुपम खेरसह 14 कलाकारांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचा वाद काही थांबायला तयार नाही. येत्या शुक्रवारी 11 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. मंगळवारी मुजफ्फरपूरच्या न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांच्यासह 14 कलाकारांवर एफआरआय दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना […]

अनुपम खेरसह 14 कलाकारांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Follow us on

मुंबई : ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचा वाद काही थांबायला तयार नाही. येत्या शुक्रवारी 11 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. मंगळवारी मुजफ्फरपूरच्या न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांच्यासह 14 कलाकारांवर एफआरआय दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

मुजफ्फरपूर येथील न्यायालयाने उप-विभागीय न्यायदंडाधिकारी सब्बा आलम यांनी वकील सुधीर ओझा यांच्या तक्रार पत्रावर सुनावणी दरम्यान अभिनेता अनुपम खेर यांच्यासह 14 कलाकारांवर एफआरआय दाखल करत तसाप करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

वकील सुधीर ओझा यांनी सांगितले की, न्यायालयाने स्थानिक पोलिसांना भांदवी कमल 295, 293, 153 (ए), 504, 506, 120 (बी) आणि 34 अंतर्गत सर्व कलाकारांवर एआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ओझा यांनी 2 जानेवारीला न्यायालयात एक तक्रार पत्र दाखल केले होते, ज्यात या सिनेमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे व्यक्तीमत्व चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असून, त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावल्याचा आरोप केला होता. या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यात यावे अशी मागणीही या तक्रार पत्रात करण्यात आली होती.

हा सिनेमा सुरुवातीपासूनच वादात आहे. यात अभिनेते अनुपम खेर हे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची भूमिका निभावत आहेत, तर अभिनेता अक्षय खन्नाही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. 2004 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता जाऊन काँग्रेस सत्तेत आलं, तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार होत्या. मात्र, त्यावेळी भाजपचे अध्यक्ष आणि भाजपचे एकमेव खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राहुल गांधीना पंतप्रधान न बनवण्याची विनंती केली. त्यानंतर काँग्रेसला नाईलाजाने अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान नियुक्त करावे लागले, असे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या सिनेमाला विरोध केला आहे.