Girish Oak : माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे हेदेखील मला माहित नव्हतं, त्याचा फायदा…पहिल्या घटस्फोटाबद्दल गिरीश ओक यांचं वक्तव्य

Girish oak : गिरीश ओक यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.

Girish Oak : माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे हेदेखील मला माहित नव्हतं, त्याचा फायदा...पहिल्या घटस्फोटाबद्दल गिरीश ओक यांचं वक्तव्य
| Updated on: Oct 12, 2026 | 7:03 PM

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. गिरीश ओक यांचं पहिलं लग्न पद्मश्री पाठक यांच्याशी झालेलं. मात्र, त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर गिरीश ओक यांनी पल्लवी ओक यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर गिरीश यांना टीकेला सामोरं जावं लागलेलं. एका मुलाखतीत गिरीश ओक यांनी याबद्दल खंत व्यक्त केलेली आणि पहिल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलेलं.

पहिल्या घटस्फोटाबद्दल काय म्हणाले गिरीश ओक?

Loading...

‘दूरदर्शन‘ला दिलेल्या मुलाखतीत गिरीश ओक म्हणाले होते की, ‘या सर्व प्रकरणाबाबत एकच बाजू दाखवली गेली. माझी बाजू कोणालाच कळली नाही. कायदा हा बायकांच्या बाजूने असतो. त्यामुळे या घटस्फोटामध्ये माझी चूक होती असा अनेकांचा गैरसमज झाला. त्यावेळी मी फक्त काम करत होतो. माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे देखील मला माहित नव्हतं. या सगळ्याचा फायदा घेण्यात आला. पण घटस्फोटाच्या वेळी माझ्याकडे होतं नव्हतं ते सगळं देऊन टाकलं. दुसऱ्या लग्नानंतर शून्यापासून सुरुवात केली. काहीच नसताना पल्लवीने साथ दिली. तिच्यामुळेच मी हे सगळं करू शकलो.’

दुसरं लग्न झाल्यावर बऱ्याच जणांनी पल्लवीला दोष दिला. तिच्यामुळेच घटस्फोट झाला असा गैरसमज झाला होता. तो काळ खूपच कठीण होता, असंही गिरीश ओक मुलाखतीदरम्यान म्हणाले.

दरम्यान, गिरीश ओक आणि पल्लवी यांची भेट एका बस प्रवासादरम्यान झाली. त्यावेळी, गिरीश यांचा घटस्फोट झाला नव्हता. त्यावेळी गिरीजा बारावी पास झालेली. या बस प्रवासादरम्यान गिरीश आणि पल्लवी यांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. त्यानंतर त्यांचं बोलणं सुरू झालं.

गिरीश ओक यांच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ते झी मराठी वाहिनीवरील ‘दीप ज्योती‘ या मालिकेमध्ये काम करत आहेत. तसंच यापूर्वी त्यांनी अगं बाई सुनबाई, अगं बाई सासूबाई यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं असून अनेक नाटकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us