Govinda : सुनीतासोबत घटस्फोट घेणार गोविंदा? अभिनेत्यानं एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाला…
Govinda On Extra Marital Affair : अभिनेता गोविंदानं घटस्फोटाबद्दल भाष्य केलं असून विवाहबाह्य संबंधांबद्दलही भाष्य केलं आहे.

बॉलिवूडचा ‘हिरो नं. १’ गोविंदा सात वर्षांनंतर ‘रूपा’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. अलीकडेच, सुनितानं न्यायालयातून घटस्फोटाचा खटला मागे घेतला. तिनं असंही म्हटलं होतं की, जर तिनं खटला मागे घेतला नसता, तर गोविंदाने दुसरं लग्न केलं असतं. आता, गोविंदानं त्याच्या कौटुंबिक कलहाबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे.
घटस्फोटाबद्दल काय म्हणाला गोविंदा?
पत्नी सुनितासोबतच्या नात्याबद्दल गोविंदा म्हणाला, ‘मी स्त्रियांना विचारतो… मी तिला गोष्टी का समजावून सांगाव्यात? मला माहित आहे की, ती जे काही करत आहे ते मुलांच्या भल्यासाठी आहे. सुनिता माझं पहिले प्रेम आहे. जेव्हा माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा सुनिताने माझ्याकडे स्वातंत्र्य मागितलं, जे मी मान्य केलं. ती तिचं आयुष्य तिला हव्या त्या पद्धतीनं जगत आहे. माझं घर सुनीतासाठी नेहमीच खुलं आहे आणि मी तिला माझाच एक भाग मानतो.’
जेव्हा गोविंदाला सुनीतासोबतच्या घटस्फोटाबद्दल विचारलं असताअभिनेता म्हणाला की, ‘नाही, नाही, आम्ही हिंदू आहोत. आमच्याकडे घटस्फोट हा शब्द नाही. ‘तलाक’ असा शब्द नाही. हा प्रश्नच उद्भवत नाही.’ पुढे विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांवर गोविंदा म्हणाला की, ‘मिस युनिव्हर्ससारख्या चार अभिनेत्री मला भेटल्या आहेत, पण मला त्यांना कधीच व्यवस्थित भेटता आलं नाही. तसं न केल्याबद्दल मला पश्चात्ताप होतो. आज जर मला संधी मिळाली, तर मी त्यांना नक्कीच भेटेन.’
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला जवळपास ३९ वर्षे झाली आहेत. गोविंदा आणि सुनिता यांना यश नावाचा एक मुलगा आणि टीना नावाची एक मुलगी आहे. अनेक वर्षांनंतर, जेव्हा या सुखी जोडप्याच्या वैवाहिक जीवनात दुरावा आल्याची बातमी समोर आली, तेव्हा सर्वांना धक्का बसला. पण पहिल्यांदाच गोविंदानं स्पष्ट केलं की, काहीही झालं तरी तो आणि सुनिता कधीही वेगळे होणार नाहीत.