Harshvardhan Rane : ‘सनम तेरी कसम’ फेम ‘हर्षवर्धन राणे’चा नवा सिनेमा ‘सिला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कधी प्रदर्शित होणार?
हर्षवर्धन राणे आणि सादिया खतीब मुख्य भूमिकेत असलेला 'सिला' रोमँटिक ॲक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरमध्ये हर्षवर्धनचा दमदार आणि जखमांनी भरलेला लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.या चित्रपटात प्रेम, सूड आणि रहस्याची कथा पाहायला मिळणार असून, याचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

‘सनम तेरी कसम’ मधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारा अभिनेता ‘हर्षवर्धन राणे’ आता नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘सिला’ या चित्रपटाचा नवा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हर्षवर्धनचा लूक सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
पोस्टरमध्ये हर्षवर्धनचा दमदार अंदाज
‘सिला’ च्या नव्या पोस्टरमध्ये ‘हर्षवर्धन राणे’ वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. त्याच्या शरीरावर जखमांच्या खूणा असून, त्याचा लूक चित्रपटातील अॅक्शन आणि संघर्षाची झलक दाखवतो. पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी प्रेम, प्रवास आणि नशीबाशी जोडलेली गोष्ट आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेमकथेच्या जोडीला अॅक्शन आणि रहस्यही पाहायला मिळणार आहे.
प्रेम , सूड आणि रहस्याची गोष्ट
‘सिला’ हा रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात हर्षवर्धन राणे ‘विराट’ नावाचं पात्र साकारत आहे. अभिनेत्री ‘सादिया खतीब’ सिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेमकथेला अनेपेक्षित वळण मिळतं आणि विराटसमोर मोठी आव्हानं उभी राहतात. याभोवची चित्रपटाची कथा फिरते.
या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे. यांनी यापूर्वी ‘मेरी कोम’ आणि ‘सरबजीत’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘सिला ‘ मध्ये करणवीर मेहरा आणि इप्सिता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहे.
हर्षवर्धननेही या चित्रपटातील भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीतील आव्हानात्मक अनुभवांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.आता ‘सिला’ चा नवा पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची आणि कथेची उत्सुकता लागून राहिली आहे. हा चित्रपट 5 फ्रेबुवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.