….तर स्वतःला उघडं पाडाल, Gen Z वर इला अरुण यांची टीका, केलं वादग्रस्त वक्तव्य

Ila Arun : सुप्रसिद्ध गायिका इला अरुण यांनी जेन झीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

....तर स्वतःला उघडं पाडाल, Gen Z वर इला अरुण यांची टीका, केलं वादग्रस्त वक्तव्य
| Updated on: Oct 15, 2026 | 7:03 PM

आपल्या दमदार आवाजानं देश-विदेशात कलेचा प्रसार करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजस्थानी लोकगायिका आहेत. इला अनेकदा बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्या सामाजिक विषयावर परखडपणे त्यांचं मत व्यक्त करतात. अशातच आता इला अरुण यांनी गुरुवारी ‘आज तक पंचायत राजस्थान’च्या मंचावर हजेरी लावली. यादरम्यान, त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तुम्ही मूळच्या राजस्थानच्या आहात, पण मुंबईत आल्यानंतर तुमचं मत बदललं का? असं विचारल्यावर इला अरुण म्हणाल्या की, त्यांचा जन्म जोधपूरमध्ये झाला आणि त्यांचं संगोपन जयपूरमध्ये झालं. मुंबईत राहूनही त्यांची नाळ राजस्थानशी जोडलेली आहे, असंही इला म्हणाल्या.

जेन झींबद्दल इला यांचं वक्तव्य

Loading...

पुढे, आजच्या तरुण पिढीबद्दल (जेन-झी) आणि त्यांच्या निषेधाच्या पद्धतींबद्दल बोलताना इला यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, भाषा हे माणसाचं वस्त्र आहे आणि जर तुम्ही संयम गमावला तर तुम्ही स्वतःला उघडं पाडता. पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही उच्च पदावरील व्यक्तीविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांचा त्यांना तिरस्कार आहे, असंही इला म्हणाल्या.

 

इला यांनी सांगितला प्रसंग

एका घटनेची आठवण सांगताना त्या म्हणाल्या की, एखाद्या रॉकस्टारच्या कॉन्सर्टमध्ये तरुण पिढी, विशेषतः मुली, भानावर नसल्याचं पाहून त्यांना लाज वाटली. इला म्हणाल्या की, संस्कृती विसरून अशा प्रकारे वागणं ही सरकारची जबाबदारी नाही, तर पालक आणि स्वतः तरुणांची आहे. आजकालच्या रॅप गाण्यांसाठी इला यांनी थेट तरुणांच्या मानसिकतेलाही जबाबदार धरलं.

कार्यक्रमाच्या शेवटी, त्यांच्या प्रसिद्ध ‘चरखा’ या गाण्यावर चर्चा करताना इला अरुण यांनी सांगितलं की, चरखा ४०० वर्षे जुना आहे आणि काळाबरोबर सर्व काही बदलावं लागतं. त्यांच्या या विचाराचं लोकांनी खूप कौतुक केलं. आज राजस्थानमध्ये अशी एकही व्यक्ती नाही, जिनं या गाण्यावर आधारित रील बनवली नसेल. शेवटी, महिलांबद्दल भाष्य करताना इला म्हणाल्या की, ‘जर महिला असतील, तर भारत आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us