‘भाभीजी घर पर हैं’ फेम अभिनेता ICUमध्ये; उपचारासाठी पैसेही नाहीत बहिणीकडून मदतीची विनंती

‘FIR’ आणि ‘भाभीजी घर पर हैं’सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेता ईश्वर ठाकूर सध्या ठाण्यातील रुग्णालयाच्या ICUमध्ये दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानंतर कुटुंबीयांनी उपचारासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ फेम अभिनेता ICUमध्ये; उपचारासाठी पैसेही नाहीत बहिणीकडून मदतीची विनंती
TV ACTOR
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 9:36 PM

टिव्हीवर आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना हसवणारे, बहुतेक मुलांच बालपण अविस्मरणीय करणारे अभिनेते ईश्वर ठाकूर सध्या रूग्णालयाच्या ICU मध्ये जीवन मरणाची झुंज देत आहेत.  ‘FIR’ आणि ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या ईश्वर ठाकूर यांची प्रकृती अचानक गंभीर झाली आहे. ठाण्यातील रूग्णालयात त्याच्यांवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे.

मात्र ईश्वर ठाकूर यांच्यासमोर आजारासोबतच आर्थिक संकटाचंही मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उपचारासाठी कुटुंबाने आतापर्यंतची बचत खर्च केली असून आता पुढील उपचारांचा खर्च भागवणं कठीण होत आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं आहे.

2020 मध्ये झाली आजाराची लागण

ईश्वर ठाकूर यांच्या आरोग्याच्या समस्या 2020 मध्ये सुरू झाल्या. सुरूवातीला पायाला जखम झाली. मधुमेह असल्याने जखम चिघळली आणि संसर्ग वाढत गेला. त्यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार हा संसर्ग शरीरात पसरला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु शरीर काही साथ देत नाही आहे. याशिवाय त्यांना किडनीच्याही समस्या आहेत.

आर्थिक मदत

ईश्वर ठाकूर यांच्या उपचारासाठी याआधीही मनोरंजन क्षेत्रातील अनेक जण पुढे आले होते. FIR आणि भाभीजी घर पर है च्या निर्मात्यांनी तसेच काही सहकलाकारांनी कुटुंबाला आर्थिक मदत केली होती. याशिवाय अभिनेत्री कविता कौशिक यांनीही ईश्वर यांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

उपचारासाठी पैसे कमी पडले

मात्र आता परिस्थिती पुन्हा गंभीर झाली आहे. ईश्वर यांच्या उपचारासाठी कुटुंबाने आपली बचत खर्च केल्याचं त्यांच्या बहिणीने सांगितल् आहे. उपचाराचा खर्च भागवण्यासाठी कुटुंबाला घर विकावं लागल्याचंही त्यांच्या बहिणीने सांगितले आहे.

कुटुंबात केवळ आणि बहिणीचा आधार

ईश्वर ठाकूर हे 54 वर्षांचे असून ते अविवाहित आहेत. ते आई आणि धाकटी बहीण जयश्री यांच्यासोबत राहत होते. त्यांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये जयश्री त्यांची काळजी घेत आहे. याशिवाय धडपडही करत आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us