Jackie Shroff : जॅकी श्रॉफच्या प्रेमात थेट घरात सवत आणण्यासही तयार होत्या आयेशा खान, काय आहे तो किस्सा?

जॅकी श्रॉफ यांच्या प्रेमात वेड्या झालेल्या आयशा दत्त यांनी लग्नासाठी त्यांच्या आयुष्यात सवत बनण्याचीही तयारी दर्शवली होती. यासाठी त्यांनी जॅकी यांच्या पहिल्या प्रेयसीला एकत्र राहण्याबाबत पत्रही लिहिलं होतं. श्रीमंत कुटुंबातील आयशा यांनी जॅकी यांच्यासाठी सर्व ऐशोआराम सोडले आणि चाळीतील राहण्यास सुरुवात केली. अखेर ५ जून १९८७ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली

Jackie Shroff : जॅकी श्रॉफच्या प्रेमात थेट घरात सवत आणण्यासही तयार होत्या आयेशा खान, काय आहे तो किस्सा?
JACKIE AND AAYESHA DUTT
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 23, 2026 | 10:10 PM

प्रेमात माणूस काय करेल याचा नेम नसतो. पण बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा दत्त यांची प्रेमकहानी ऐकली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जॅकी श्रॉफ यांच्याशी लग्न करण्यासाठी आयशा इतक्या आतूर होत्या की एकेकाळी त्या जॅकी यांच्या आयुष्यात सवत बनायलाही त्या तयार होत्या. एवढंच नाही तर आपल्या प्रेमाखातर त्यांनी श्रीमंती सोडून चाळीत संसार थाटला.

आयशा यांनी एका जुन्या मुलाखतीत आपली लव्हस्टोरी सांगितली होती. त्या 13 वर्षांच्या असतानाच त्यांनी मनाशी ठरवलं होतं की लग्न करायचं तर जॅकी श्रॉफ यांच्याशीच! पुढे त्या दोघांची ओळख वाढत गेली, अधिक घट्ट झाली आणि आयशा यांचं प्रेम आणखीनच वाढत गेलं.

Loading...

पण या त्यांच्या लव्हस्टोरीत एक ट्विस्ट होता तो म्हणजे जॅकी श्रॉफआधीच एका मुलीला डेट करत होते. ते आधीच एका मुलीच्या प्रेमात होते.पण ती मुलगी काही दिवसांतच अमेरिकेला शिक्षणासाठी निघून गेली. पण ती लवकरच परतही येणार होती. हे ऐकल्यावर आयशा खान यांनी चक्क त्या मुलीला पत्र लिहिलं.

या पत्रात आपण दोघीही जॅकीशी लग्न करू आणि बहिणीसारखं राहू असे तिने लिहिले होते. पण आयशा यांनी नंतर स्पष्ट केलं की आपण चांगलं केलं की वाईट हे माहित नाही. मात्र त्यांना जॅकी श्रॉफ ना गमवायचं नव्हत.

5 जून 1987 रोजी जॅकी श्रॉफ आणि आयशा दत्त यांनी लग्नगाठ बांधली. आयशा या श्रीमंत कुटुंबातून आल्या होत्या, पण जॅकी श्रॉफ त्यावेळी चाळीत राहत होते. लग्नानंतर त्यांनी श्रीमंती बाजूला सारली आणि जॅकी श्रॉफसोबत चाळीत आपला संसार थाटला.

एका खोलीच्या घरात 6 जणांसोबत राहण्यापासून ते शौचालयाबाहेर रांगेत उभं राहण्यापर्यंतचे दिवस त्यांनी अनुभवले. मात्र तरीही या परिस्थितीमुळे त्यांनी जॅकी यांची साथ सोडली नाही. जॅकी यांनीही एका मुलाखतीत आयशा यांनी त्यांना कठीण काळात साथ दिल्याचं सांगितलं होतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us