Jaywant Wadkar : मल्याळी असूनही स्वामींचा भक्त, जयवंत वाडकरांच्या पत्नीनं केलं जावयाचं कौतुक; म्हणाल्या, त्याच्यामुळे…
Jaywant Wadkar Son In Law : जयवंत वाडकर यांच्या मुलीनं मल्याळी मुलासोबत लग्न केलं असून तो स्वामींचा भक्त आहे. आता एका मुलाखतीत जयवंत वाडकर यांच्या पत्नीनं जावयाचं कौतुक केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या लेकीचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं. त्यांचा जावई केरळचा आहे. अशातच आता एका मुलाखतीत जयवंत वाडकर यांनी स्वामी समर्थांच्या भक्तीबद्दल सांगितलं असून जावयाचंही कौतुक केलं आहे.
जयवंत वाडकर यांच्या पत्नीनं केलं जावयाचं कौतुक
जयवंत वाडकर आणि त्यांच्या पत्नीनं नुकतीच ‘अभिजात मराठी फिल्मी‘ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान जयवंत वाडकर यांच्या पत्नी जावयाबद्दल म्हणाल्या की, ‘ वरुणचं एक वैशिष्ट्य सांगते की, तो केरळचा आहे, मल्याळी आहे. पण, तो स्वामी समर्थ यांचा परमभक्त आहे.’
‘आमची मुलगी स्वामिनी ही स्वामी समर्थांच्या नवसाने झालेली आहे, म्हणून तिचं नाव स्वामिनी आहे. तिचं बारसं आम्ही दादरच्या मठामध्ये केलं आहे. मी देवाला म्हणाले होते की, मी तुझंच नाव मुलीला देईन. जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा जयवंत शूटिंग करत होता. त्याने मला फोन करून सांगितलेलं की, मुलगी झाली नाही तर तू तिथेच राहा. कारण त्यांना सख्खी बहीण नाही, त्यामुळे त्यांना मुलगी हवी होती.’
‘वरुण स्वामिनीच्या आयुष्यात आल्यानंतर स्वामींनी स्वामीच्या भक्ताला जोडलं असं मला वाटतं. वरुणमुळे आम्ही सतत अक्कलकोटला जायला लागलो. म्हणजे महिन्यातून दोन-तीन वेळा अक्कलकोटला गेलेलो आहे.’ असं जयवंत वाडकर यांच्या पत्नी म्हणाल्या.
दरम्यान, वरुण आणि स्वामिनी यांनी मे 2026 मध्ये लग्नगाठ बांधली. स्वामिनीच्या लग्नाला अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, स्वानंदी बेर्डे, शार्दुल पाटकर यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. स्वामिनी ही स्वानंदी बेर्डेची फार जवळची मैत्रीण आहे. स्वामिनीच्या लग्नाबद्दल स्वानंदी म्हणालेली की, ‘हा लग्नसोहळा साऊथ इंडियन प्लस मराठमोळा असा दोन्ही आहे. मी तिच्यासाठी खूप जास्त खूश आहे. तिचं लग्न आहे म्हटल्यावर मला मनात इतकी धडधड होत होती. फायनली तिचं लग्न होतंय आणि मन भरून आलंय.’
स्वामिनीच्या कामाबद्दल सांगायचं तर, स्वामिनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतात. ‘अशी ही आशिकी’, ‘बाबा’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये तिने काम केलंय. याशिवाय ती ‘HC London’ या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे.