जस्टिन बीबरच्या एक्स गर्लफ्रेंडचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन, ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यूच्या दाढेत
Justin Bieber Ex Girlfriend Death : जस्टिन बीबरच्या एक्स गर्लफ्रेंडचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन झालं आहे.

ऑस्ट्रेलियन मॉडेल-इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरची एक्स गर्लफ्रेंड सहारा रे हिचं निधन झालं आहे. ती ३४ वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सहारानं फेंटॅनिलचा ओव्हरडोस घेतला, ज्यामुळे तिची प्रकृती खालावली. प्रकृती अधिकच खालावल्यानंतर तिला लॉस एंजेलिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रविवारी तिची प्रकृती अधिकच खालावल्यानं तिच्या कुटुंबीयांनी तिचे लाईफ सपोर्ट काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
डेली मेलनं सहाराचा मृत्यू ड्रग ओव्हरडोसमुळे झाल्याचं वृत्त दिलं आहे. सहाराची आई, ग्रेचेन बेक यांनी डेली मेलला सांगितलं की, सहारा एक उत्साही आणि चांगली मुलगी होती. तिला तिचं कुटुंब, फॅशन, तिची मुलगी, बर्फ आणि सर्फिंग खूप आवडायचं.
सहारा दुसऱ्यांदा आई झाली होती
यावर्षी जानेवारी महिन्यात सहारा रेनं तिच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. काही आठवड्यांपूर्वी, तिनं सोशल मीडियावर तिच्या मुलीबद्दल एक पोस्ट केली होती, जी तिची शेवटची पोस्ट ठरली. या पोस्टमध्ये तिनं आपल्या मुलीबद्दल ‘माझ्या हृदयाचा एक तुकडा’ असं म्हटलेलं.
२०१६ मध्ये जस्टिनसोबत नाव जोडलं गेलं
जवळपास १० वर्षांपूर्वी, २०१६ मध्ये, कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबरसोबतच्या तिच्या डेटिंगच्या अफवा पसरल्यावर सहारा रेचं नाव चर्चेत आलं. विमानात असतानाचे तिचे आणि बीबरचे फोटो व्हायरल झाले होते. सहारा एक स्विमवेअर डिझायनर होती आणि तिचा स्वतःचा ‘सहारा रे स्विम’ नावाचा स्विमवेअर ब्रँड होता.
सहारा या आजाराशी झुंज देत होती
दोन वर्षांपूर्वी, २०१६ मध्ये, सहारा रेने खुलासा केला की, ती गिलियन-बॅरे सिंड्रोम या ऑटोइम्यून आजारानं ग्रस्त आहे. एका कार अपघातानंतर या आजारामुळे तिला अर्धांगवायू झाला. या गंभीर अर्धांगवायूचा तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीवरही गंभीर परिणाम झाला. सहारा सार्वजनिकरित्या शेवटची नोव्हेंबर २०२३ मध्ये लॉस एंजेलिसमधील एका फॅशन शोमध्ये दिसली होती. त्यानंतर, २०२४ मध्ये तिच्या आजारपणाच्या आणि आरोग्याच्या समस्यांच्या बातम्या समोर आल्या. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती.