ती आली, तिनं मिठी मारली अन्…करीना कपूर आणि शाहिद कपूर पुन्हा दिसले एकत्र, भूतकाळ विसरून…
Kareena Kapoor And Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि करीना कपूर एका कार्यक्रमात पुन्हा एकत्र दिसले असून चाहते त्यांना पाहून खूप आनंदी झाले आहेत.

चाहते आयफा पुरस्कारांबद्दल नेहमीच उत्सुक असतात. आयफा पुरस्कार सोहळा २७ ऑक्टोबर रोजी अबू धाबी येथे सुरू होणार आहे.
आयफा पुरस्कार सुरू होण्यापूर्वी, मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यात बॉलिवूड, टीव्ही आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खाननं मुंबईतील कार्यक्रमात दिमाखदार एन्ट्री केली. नेहमीप्रमाणेच, भाईजाननं सर्व सेलिब्रिटींमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचीही आयफा पुरस्कार सोहळ्यात भेट झाली. करीना काळ्या रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होती. शाहिदने या कार्यक्रमासाठी पांढरा सूट परिधान केला होता. जेव्हा शाहिद आणि करीना कार्यक्रमात भेटले, तेव्हा ते हसले आणि त्यांनी गप्पा मारल्या.
करीना आली, थांबली आणि तिनं शाहिदला मिठी मारली. शाहिद आणि करीनाला हसताना पाहून त्यांनी भूतकाळातील कटू आठवणी मागे टाकल्या आहेत, हे दिसून येतंय. शाहिद आणि करीनाला एकत्र बघू चाहते खूप आनंदी झाले आहेत.
दरम्यान, शाहिद आणि करीना एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते, पण काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.