‘केसरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसांची कमाई तब्बल….

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 1897 च्या सारागढीच्या ऐतिहासिक लढाईवर आधारित असलेल्या ‘केसरी’ या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत 50 कोटींच्यावर कमाई केली आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली. #Kesari shows an upward trend on Day 3 [Sat]… Metros pick […]

‘केसरी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसांची कमाई तब्बल....
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 1897 च्या सारागढीच्या ऐतिहासिक लढाईवर आधारित असलेल्या ‘केसरी’ या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत 50 कोटींच्यावर कमाई केली आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली.

‘केसरी’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 21.50 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 16.70 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी शनिवारी 18.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तीन दिवसांत या सिनेमाने तब्बल 56.51 कोटींची कमाई केली आहे.

हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या सिनेमाची प्रशंसा केली. या सिनेमाची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या सिनेमाची तीन दिवसांची कमाई बघता लवकरच हा सिनेमा 100 कोटी क्लबमध्ये येऊ शकतो.

21 शिखांच्या शूरतेची कहाणी ‘केसरी’

122 वर्षांपूर्वी म्हणजेच 1897 मध्ये 21 शिखांनी 10 हजार अफगाणी हल्लेखोरांशी लढाई केली होती. सारागढी येथे 12 सप्टेंबर 1897 ला ही लढाई लढली गेली. ‘केसरी’ हा सिनेमा याच लढाईवर आधारित आहे.