Kichcha Sudeep : 11 वर्षांपूर्वी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर, प्रेमाखातर नात्याला दिली संधी, 25व्या लग्नाच्या वाढदिवशी प्रसिद्ध अभिनेत्यानं पुन्हा बांधली गाठ सात जन्माची

Kichcha Sudeep Marriage : प्रसिद्ध अभिनेत्यानं 25व्या लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.

Kichcha Sudeep : 11 वर्षांपूर्वी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर, प्रेमाखातर नात्याला दिली संधी, 25व्या लग्नाच्या वाढदिवशी प्रसिद्ध अभिनेत्यानं पुन्हा बांधली गाठ सात जन्माची
| Updated on: Oct 21, 2026 | 9:18 PM

कन्नड चित्रपट अभिनेता किच्चा सुदीप आणि त्याची पत्नी प्रिया यांनी त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला आहे. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये सुदीप आणि प्रिया एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. या सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुदीप पत्नी प्रियासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे.

मात्र, एक वेळ अशी आलेली जेव्हा किच्चा सुदीप आणि प्रिया घटस्फोटाच्या उंबरठ्यावर होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या जोडप्यानं २०१५ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु नंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. किच्चा सुदीप आणि प्रिया यांचं लग्न १८ ऑक्टोबर २००१ रोजी झालं होतं. या जोडप्याला सान्वी सुदीप नावाची एक मुलगी आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर, २०१५ मध्ये त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. परिस्थिती इतकी चिघळली की, त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सुदीपनं पोटगीची एक निश्चित रक्कम देण्याचं आणि प्रियाला त्यांच्या मुलीचा ताबा देण्याचं मान्य केलं होतं. पण, नंतर त्यांनी आपल्या निर्णयावर पुनर्विचार केला आणि घटस्फोटाची प्रक्रिया पुढे गेली नाही.

Loading...

 

 

 

दोन वर्षांनंतर घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला

सुदीप आणि प्रियानं २०१७ मध्ये घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आणि आपल्या नात्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कर्नाटकच्या न्यायालयात एकत्र राहण्यास लेखी संमती दिली. यानंतर, त्यांच्या नात्यातील दुरावा कमी होत असल्याच्या बातम्या समोर आल्या.  लग्नसोहळ्याला सुदीपने त्याची आई, सरोजा संजीव यांचा फुलांनी सजवलेला आपल्या आईचा एक मोठा फोटो लावला. अभिनेत्याची आई सरोजा, यांचं २० ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु त्यांना वाचवता आलं नाही.

दरम्यान, कन्नड स्टार किच्चा सुदीपच्या कामाबद्दल सांगायचं तर तो ‘बिल्ला रंगा बाशा’, ‘मार्क’ आणि ‘स्कूल बस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तो ‘केके’ या गँगस्टर ड्रामामध्ये दिग्दर्शक म्हणूनही काम करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us