Kiran Mane : हराम्यांची चर्चा हिडीस आणि संतापजनक…500 कोटींच्या प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट
Kiran Mane Post : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यावर 500 कोटींच्या व्यवहाराचा आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. यावर किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.

५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.
जरांगे यांचा दावा आहे की, एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचं आंदोलन कमकुवत करण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख आहे.
मात्र, या प्रकरणात एक वेगळं वळण असं आहे की, एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्यांनी कोणालाही ५०० कोटी रुपये दिले किंवा घेतले नाहीत. यावर मराठी अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इतके सुमार बुद्धिमत्तेचे भंपक लोक संगोट्यांचं कपट कारस्थान रचत असतील तर त्या संपुर्ण नीच पिलावळीचा कल्पनेहून भयानक गंभीर शेवट होणार आहे !
जरांगेंनी ऐकवलेली या हराम्यांची चर्चा हिडीस आणि संतापजनक आहे, असं किरण माने यांनी शेवटी म्हटलंय.