Aamir khan | मी आमिर खानचा पुरेपूर वापर केला.. अभिनेत्याची माजी पत्नी स्पष्टच बोलली

| Updated on: Feb 29, 2024 | 4:20 PM

मी तर आमिरचा पूरेपूर वापर केला. त्याची स्टार पॉवर पूर्णपणे वापरून मी वसूल केली. तो आत्ता इथे असता, तर मी त्याला स्पष्ट सांगितलं असतं, मला तीन चित्रपट अजून दे. मी तर सगळ्यांना सांगत असते. अमिरच्या माजी पत्नीचं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.

Aamir khan | मी आमिर खानचा पुरेपूर वापर केला.. अभिनेत्याची माजी पत्नी स्पष्टच बोलली
Follow us on

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या अभिनयाचं नाणं नेहमी खणखणीत वाजतं. प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच तो पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नुकताच, त्याची लेक आयरा खानचा विवाह पार पडला. तेव्हा आमिरचं संपूर्ण कुटुंब, त्याच्या दोन्ही माजी पत्नी रीना आणि किरण रावही उपस्थित होत्या. सध्या किरण राव ही देखील चर्चेत आहे. त्याच कारण म्हणजे 1 मार्च रोजी तिचा ‘लापता लेडीज’ हा पिक्चर रिलीज होतोय. किरणने हा पिक्चर दिग्दर्शित केला असून, ती अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. यापूर्वी तिने धोबीघाट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘लापता लेडीज’ मध्ये अनेक नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली असून चित्रपटाचा ट्रेलरही लोकांना बराच आवडल्याचं दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी किरण राव आणि संपूर्ण टीम जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

मात्र याच प्रमोशनदरम्यान किरण रावने केलेल्या एका वक्तव्याची बरीच चर्चा सुरू आहे. बोलता-बोलता किरणने, (आपम) आमिर खानचा वापर केल्याचे वक्तव्य केलं. पण तिने असं का म्हटलं, ती नेमकं काय बोलली ते जाणून घेऊया. ‘लापता लेडीज’ च्या प्रमोशन दरम्यान आमिर खानही दिसत असतो, कारण त्याने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. पण एका मुलाखतीसाठी किरण एकटीच आली होती, तेव्हा तिने आमिरबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या.

आमिरबद्दल काय म्हणाली किरण राव ?

एका मुलाखतीदरम्यान किरण रावला आमिर खान बद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्याची किरणने बेधडकपणे,दिलखुलास उत्तरं दिली. आमिर खानचे नाव घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे तिने उघडपणे सांगितले. या मुलाखतीत किरण रावला विचारण्यात आलं की, ‘लापता लेडीज’च्या प्रमोशनवेळी आमिर खान तुमच्यासोबत सतत दिसला होता. त्याने तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रमोशन केलेलं दिसतंय. जिथे-तिथे तो तुमच्यासोबत दिसत होता. आमिर खानने तुम्हाला चित्रपट बनवण्यात खूप मदत केली असेल ना ? असे काही प्रश्न किरण रावला विचारण्यात आले.

मी आमिरचा पूरेपूर वापर केला…

त्यावर किरणने स्पष्टपणे ही गोष्ट मान्य करत उत्तर दिलं. ‘ नक्कीच, मी तर आमिरचा पूरेपूर वापर केला. त्याची स्टार पॉवर पूर्णपणे वापरून मी वसूल केली. तो आत्ता इथे असता, तर मी त्याला स्पष्ट सांगितलं असतं, मला तीन चित्रपट अजून दे. मी तर सगळ्यांना सांगत असते, 1 मार्चला आमचा ‘लापता लेडीज’ चित्रपट येतोय. तो नक्की पहा. तो ( चित्रपट) आमिर खानने बनवला आहे. जरूर बघा, नक्की पहा. तुम्हाला तर माहित्ये मी त्याचा वापर करते,न घाबरता न लाजता त्याचा वापर करते हो ‘ अशा सडेतोड शब्दात किरणने उत्तर दिलं.

आमिर-किरणचा घटस्फोट

पहिली पत्नी रीना हिला घटस्फोट दिल्यानंतर अनेक वर्षांनी आमिर खान याने 2005 साली किरण राव हिच्याशी लग्न केलं. त्यांना आझाद नावाचा एक मुलगाही आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांनी त्या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होत असल्याचा निर्णय जाहीर केला. 2021 साली आमिर खान- किरण रावचा घटस्फोट झाला.