Laila Khan : 36 वर्षांनी मोठ्या राजेश खन्नांसोबत दिले रोमँटिक सीन्स, सावत्र वडिलांनीच ढकललं मृत्यूच्या दाढेत, 13 वर्षांनी उलगडलं रहस्य, काय घडलेलं?

Bollywood Actress : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीनं राजेश खन्ना यांच्यासोबत रोमँटिक सीन्स दिले होते. त्यामुळे ती वादात सापडलेली. त्यानंतर अभिनेत्रीची तिच्या कुटुंबियांसह हत्या करण्यात आली.

Laila Khan : 36 वर्षांनी मोठ्या राजेश खन्नांसोबत दिले रोमँटिक सीन्स, सावत्र वडिलांनीच ढकललं मृत्यूच्या दाढेत, 13 वर्षांनी उलगडलं रहस्य, काय घडलेलं?
| Updated on: Oct 25, 2026 | 6:54 PM

काही कथा इतक्या भयंकर असतात की, काळाच्या आणि दुःखाच्या ओझ्याखाली दबून त्या आजही आपल्याला सतावत राहतात. अशीच एक कथा आहे बॉलिवूड अभिनेत्री लैला खानची. १९७८ मध्ये रेश्मा पटेल म्हणून जन्मलेल्या लैलानं २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘वफा: अ डेडली लव्ह स्टोरी’ या चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलं होतं. पण, एके दिवशी तिच्या आयुष्यानं असं वळण घेतलं की, तिचं नाव आणि ओळखच पुसून गेली.

२०११ मध्ये हत्या

Loading...

२०११ साली लैलाच्या आयुष्याला एक दुःखद वळण लागलं, जेव्हा तिची आणि तिच्या कुटुंबातील इतर पाच सदस्यांची हत्या करण्यात आली. राजेश खन्नांसोबतचा तिचा चित्रपट यशस्वी झाला नाही, पण तरीही तो तिला प्रसिद्धीच्या झोतात घेऊन आला. त्यावेळी लैलाचा सिनेमा वादात सापडला होता, कारण त्यात लैला तिच्यापेक्षा वयानं खूप मोठे असलेल्या अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत अनेक रोमँटिक सीन्समध्ये दिसली होती. त्यावेळी राजेश खन्ना यांचं वय 60 पेक्षा जास्त होतं, तर लैला तिच्या विशीत होती. त्यांच्यातील जवळपास 36 वर्षांच्या वयाच्या फरकामुळे, त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते.

सुरुवातीला बॉलिवूडमधील छोट्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी लैला, नंतर दहशतवादी कारवायांशी असलेल्या तिच्या संबंधांमुळे चौकशीच्या फेऱ्यात आली. अनेक अहवालांनुसार, लैला आणि तिचं कुटुंब दहशतवादाला निधी पुरवणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात होते, ज्यामुळे ती चौकशीच्या फेऱ्यात आली.

लैलासोबत कुटुंबातील सदस्यांचीही हत्या

७ फेब्रुवारी २०११ रोजी लैला आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या झाली. तिचे सावत्र वडील परवेझ टाक यांनी लैलासह तिच्या कुटुंबीयांची हत्या केली, असं तपासात उघडकीस आलं. चौकशीदरम्यान, परवेझनं मालमत्तेच्या वादातून कुटुंबीयांची हत्या केल्याची कबुली दिली. परवेझ हा लैला खानच्या आईचा तिसरा पती होता. भारतीय दंड संहितेनुसार खून आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल मुंबई सत्र न्यायालयानं ९ मे २०२४ रोजी त्याला दोषी ठरवलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us