Prahaar Box Office Collection : प्रहारकडे प्रेक्षकांची पाठ आदिनाथ कोठारेच्या सिनेमाला पसंती, कमावले इतके कोटी

सध्या बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे राजकुमार रावचा 'प्रहार : द उज्वल निकम स्टोरी', तर दुसरीकडे यामी गौतमचा 'नयी नवेली'. पण चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत राज कुमार राव जरी दिसत असला तरी कसाबच्या भूमिकेतील ललित प्रभाकर याच्या अभिनयाची देशभरात चर्चा होत आहे. पण ललितच्या अभिनयाचे कौतुक जरी होत असले तरी हा सिनेमा काहीसा फ्लॉप होण्याची चिन्ह दिसत आहेत

Prahaar Box Office Collection :  प्रहारकडे प्रेक्षकांची पाठ आदिनाथ कोठारेच्या सिनेमाला पसंती, कमावले इतके कोटी
| Updated on: Oct 19, 2026 | 10:17 PM

सध्या बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे राजकुमार रावचा ‘प्रहार : द उज्वल निकम स्टोरी’, तर दुसरीकडे यामी गौतमचा ‘नयी नवेली’. पण चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत राज कुमार राव जरी दिसत असला तरी कसाबच्या भूमिकेतील ललित प्रभाकर याच्या अभिनयाची देशभरात चर्चा होत आहे. पण ललितच्या अभिनयाचे कौतुक जरी होत असले तरी हा सिनेमा काहीसा फ्लॉप होण्याची चिन्ह दिसत आहेत

16 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रद्रर्शित झालेल्या ‘प्रहार’ ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर स्लो सुरूवात केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात 2.35 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केली. त्यानंतर शनिवारी कमाईत थोडी वाढ झाली चित्रपटाने 3.15 कोटी रूपये कमावले. रविवारी तिसऱ्या दिवशी या कमाईत किचिंतशी वाढ झालेली दिसली.

Loading...

म्हणजेच प्रहारने प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांत भारतात एकूण 9.15 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केली. तर भारतातील एकूण कमाईचा आकडा 10.86 कोटी आहे. परदेशातील कमाई धरून चित्रपटाची कमाई 12.86 कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे.

या चित्रपटात राजकुमार राव यांनी सरकारी वकील उज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. तर मराठी अभिनेता ललित प्रभाकरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली. त्यामुळे या चित्रपटातील कामगिरीकडे प्रेक्षकांच लक्ष लागलं आहे.  निकम यांच्या कारकिर्दितील महत्त्वाच्या खटल्यांवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश अरूण यांनी केलं आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर कसाबविरोधात चाललेल्या खटल्यासह न्याय मिळवण्यासाठी झालेल्या कायदेशीर लढाईची झलक या चित्रपटातून पाहायला मिळते.

नयी नवेली कडून बॉक्स ऑफिसवर स्पर्धा

दुसरीकडे यामी गौतमी आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘नयी नवेली’ या चित्रपटानेही पहिल्या तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार नई नवेली या सिनेमाने तीन दिवसांत 11.65 कोटी जमा केले आहेत. त्यामुळे कमाईच्या बाबतीत प्रहार मागे पडला आहे. प्रहारची कमाई पुढील दिवसांत किती वाढते आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो.याकडे लक्ष लागले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us