Lalit Prabhakar : ‘प्रहार’ सिनेमातून ललित प्रभाकरचा महत्वाचा सीन डिलीट, अभिनेत्यानं व्यक्त केली नाराजी, म्हणाला…
Lalit Prabhakar : 'प्रहार' सिनेमातील ललित प्रभाकरचा डिलीट केलेला फायटिंग सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिनेत्यानं नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या ‘प्रहार’ या हिंदी चित्रपटातील अजमल कसाबच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा डिलीट करण्यात आलेला फाइटिंग सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची भूमिका ‘प्रहार’ चित्रपटात ललित प्रभाकरनं साकारली आहे. या व्यक्तिरेखेसाठी त्यानं केलेलं रूपांतर आणि त्याची देहबोली यामुळे चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
ललित प्रभाकरचा व्हायरल सीन
सिनेमात अबू इस्माइलची भूमिका साकारणारा अभिनेता तरुण शर्मानं हा व्हिडिओ शेअर केला असून यात ललित आणि तरुण शर्मा फायटिंग सीन करताना दिसत आहेत. पण, ‘प्रहार’ सिनेमातून हा सीन काढून टाकण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तरुण शर्मा म्हणाला की, ”प्रहार” सिनेमातील डिलिट केलेला माझा फेव्हरेट सीन. खरं तर कसाब आणि अबू इस्माइल म्हणजे ललित प्रभाकर आणि माझ्यातील हा फायटिंग आणि फ्रेंडशिप सीन होता.
कसाबच्या भूमिकेमुळे ललित प्रभाकर चर्चेत
ललित प्रभाकरनं आजवर मराठी चित्रपट आणि मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, ‘प्रहार’ सिनेमातील अजमल कसाबची भूमिका त्याच्यासाठी वेगळं आव्हान ठरली. एखाद्या वास्तविक आणि संवेदनशील व्यक्तीची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना तिची मानसिकता, बोलण्याची पद्धत आणि देहबोली समजून घेणं आवश्यक होतं. या भूमिकेसाठी ललितनं विशेष तयारी केली. त्याच्या लूकमधील बदलासोबतच व्यक्तिरेखेतील बारकावे टिपण्याचाही त्याने प्रयत्न केला.
‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावनं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर अजमल कसाबविरोधात झालेल्या न्यायालयीन खटल्याची कथा मांडण्यात आली आहे. अविनाश अरुण यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. १६ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘प्रहार’ या सिनेमानं आतापर्यंत १९ कोटी कमावले आहेत.