Prahaar Box Office Collection : ललित आणि आदिनाथच्या सिनेमात काटें की टक्कर; ‘प्रहार’ला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद, कमाईत 65 टक्क्यांची वाढ

राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांचा प्रहार : द उज्वल निकम चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू आपली पकड मजबूत करताना दिसत आहे.सुरूवातीच्या वीकेंडनंतर सोमवारी चित्रपटातच्या कमाईत मोठी घसरण झाली होती. मात्र मंगळवारी दसऱ्यानिमित्त प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या ललितला पाहण्यासाठी सिनेमागृहात मोठी गर्दी केली

Prahaar Box Office Collection :  ललित आणि आदिनाथच्या सिनेमात काटें की टक्कर; प्रहारला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद, कमाईत 65 टक्क्यांची वाढ
PRAHAAAR BOX OFFICE COLLECTION
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 21, 2026 | 7:00 PM

राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांचा ‘प्रहार : द उज्वल निकम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू आपली पकड मजबूत करताना दिसत आहे.सुरूवातीच्या वीकेंडनंतर सोमवारी चित्रपटातच्या कमाईत मोठी घसरण झाली होती. मात्र मंगळवारी दसऱ्यानिमित्त प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या ललितला पाहण्यासाठी सिनेमागृहात मोठी गर्दी केली. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत थेट 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मंगळवारी या सिनेमाने म्हणजेच पाचव्या दिवशी थेट 3.30 कोटींची कमाई केली आहे. सोमवारी ही कमाई 2 कोटीच होती. त्यामुळे एका दिवसात कमाईत तब्बल 65 टक्क्यांची वाढ झाल्याने या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती असल्याचे निदर्शनास येत आहे. चित्रपटाची जगभरातील कमाई आता 19.51 कोटी रूपयांवर पोहोचली आहे. तर पाचव्या दिवसातील भारतातील एकूण नेट कमाई 14.45 कोटींवर पोहोचली आहे.

Loading...

 

जगभरातील कमाई 19 कोटींच्या पार

चित्रपटाच्या भारतातील एकूण ग्रॉस कमाईचा आकडा 17.21  कोटी झाला आहे. परदेशातील कमाई 2.30 कोटी असून, भारत आणि परदेशातील कमाई मिळून चित्रपटाने जगभरात 19.51 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर मंगळवारपर्यंत या चित्रपटाने परदेशात सुमारे 15 लाख रूपयांची कमाई केली आहे.

 

पण मंगळवारी प्रहारपेक्षा आदिनाथच्या ‘नयी नवेली’ सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ

यामी गौतम आणि आदिनाथ कोठारे यांचा हॉरर- कॉमेडी ‘नयी नवेली’ १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3.35 कोटीचा गल्ला जमावला. त्यानंतर शनिवारी 4 कोटी आणि रविवारी 4.40 कोटींची कमाई केली. तर सोमवारी हा सिनेमा घसरला. पण मंगळवारी प्रहार प्रमाणे याही सिनेमाने जोर धरला आणि कमाईत 64 टक्क्यांची वाढ झाली आहे. नयी नवेलीने भारतात 18.65 कोटी तर जगभरात 24.68 कोटींवर पोहोचला आहे.

आता पाचव्या दिवशी कमाईत वाढ झाल्यानंतर प्रहारची हीच गती पुढील दिवसांत कायम राहते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय कोण जास्त कमाई करतं याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दसऱ्यानिमित्त प्रेक्षकांनी दिलेला हा भरगोस प्रतिसाद असाच कायम राहतो का याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us