‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीनं अमेरिकेतून दिली गुडन्यूज, आनंद व्यक्त करत म्हणाली…
Maharashtrachi Hasyajatra Fame Actor : हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कार्यक्रम असून या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्गही आहे. या कार्यक्रमातील कलाकारही चर्चेत असतात. अशातच हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीनं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. शिवाली परबनं स्वतःचं युट्युब चॅनल सुरू केलं आहे.
शिवालीनं पोस्ट करत म्हटलं की, 'नमस्कार, मी पहिल्यांदा व्लॉग केला आहे. मी व्हिडिओ शूट केलाय, एडिट केलाय आणि माझ्या या चॅनेलवर टाकला आहे.'
'या युट्यूब चॅनेलवर मी असेच छोटे छोटे व्लॉग शेअर करत राहणार आहे. त्यामुळे नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा. आणि लाइक करा, कमेंट करा...शेअर करावासा वाटला तर शेअर करा.'
'पण, माझं असं म्हणणं आहे की, तुम्ही माझे व्लॉग एन्जॉय करा. आणि खूप सपोर्ट करा. थँक्यू सो मच' असं शिवालीनं शेवटी म्हटलं आहे.