Mahesh Manjrekar : मराठी सिनेमांचं नुकसान बाहेरच्यांनी केलेलं नाही, काही नतद्रष्ट…महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. मराठी सिनेमांचं नुकसान इंडस्ट्रीतील काहींनी केलं असल्याचं महेश यांनी म्हटलंय.

Mahesh Manjrekar : मराठी सिनेमांचं नुकसान बाहेरच्यांनी केलेलं नाही, काही नतद्रष्ट...महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
| Updated on: Oct 01, 2026 | 4:44 PM

महेश मांजरेकर सध्या त्यांच्या ‘बंडखोर‘ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं ते अनेक माध्यमांना मुलाखती देत आहेत. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मराठी इंडस्ट्रीतील निर्मात्यांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. मराठी सिनेमे न चालण्यामागे इंडस्ट्रीतील काही लोकच जबाबदार असल्याचं महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले महेश मांजरेकर?

Loading...

महेश मांजरेकर म्हणाले की, ‘इंडस्ट्रीमध्ये असे खूप लोक होत आहेत, ज्यांच्या भावना दुखावतात. हे सुरू झालेलं खरंतर ‘मिक्ता‘ या पुरस्कार सोहळ्यापासून. तो पुरस्कार सोहळा होता, माझ्या वडिलांनी अब्ज रुपये कमावलेत आणि मी सगळ्यांना पिकनिकला घेऊन जातोय, असं काही नव्हतं. पण, साधारण 300 च्या आसपास लोक यायचे तिथे. पण इथे 3000 लोक आहेत, ज्यांना जायचंय. प्रत्येक वेळी मी अनेकांना दुखवायचो. ते म्हणायचे, आम्हाला कधी घेऊन जात नाही.’

निर्मात्यांबद्दल बोलताना महेश म्हणाले की, ‘काही नतद्रष्ट निर्माते पण आहेत आणि मला त्यांच्याबद्दल माहितही आहे. ते निर्माते वाट बघत असतात, येऊ दे याचा सिनेमा, त्यांची ती विकृती जाणार नाही. मराठी सिनेमांचं नुकसान फार कोणी बाहेरच्यांनी केलेलं नाहीये, ते इथल्याच लोकांनी केलंय. आपण कधीच दुसऱ्याचं यश चिंतत नाही. जास्त सिनेमे चालले, तर इंडस्ट्रीमध्ये जास्त पैसा येईल. पण, हे जे नतद्रष्ट आहेत आणि ते मराठी लोक नाहीत, याबद्दल मला आनंद आहे. कुठे ना कुठे त्यांना फटका बसलेच. माझी जी माणसं आहेत, त्यांना माहितीये मी कसा आहे.’ ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर बोलत होते.

दरम्यान, बंडखोर या सिनेमाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा 24 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला असून या सिनेमात प्रियदर्शिनी इंदलकर, छाया कदम, मृणाल कुलकर्णी, तितिक्षा तावडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us