Mahesh Manjrekar : काही झालं की तो…सत्या मांजरेकरला होता ‘हा’ आजार, महेश मांजरेकरांनी केलेला खुलासा

Mahesh Manjrekar On Satya Manjrekar : महेश मांजरेकर यांनी एका जुन्या मुलाखतीत सत्या मांजरेकरच्या आजाराबद्दल सांगितलेलं.

Mahesh Manjrekar : काही झालं की तो...सत्या मांजरेकरला होता हा आजार, महेश मांजरेकरांनी केलेला खुलासा
| Updated on: Oct 21, 2026 | 2:35 PM

महेश मांजरेकरचा मुलगा सत्याने हॉटेल व्यवसायानंतर आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. सत्याने बालपणी सिनेमात काम केलेलं. मात्र कालांतरानं हे आपलं क्षेत्र नाही याची त्याला जाणीव झाली आणि त्यानं हॉटेल व्यवसायात पाऊल टाकलं. गोरेगावमधील ‘सुका सुखी’ या हॉटेलची जबाबदारी सांभाळत असतानाच आता त्यानं इंटेरिअर क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. ‘House fit wah ‘ नावनं त्यानं घर, ऑफिससाठी इंटेरिअर करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. अशातच महेश मांजरेकरांनी जुनी मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीत त्यांनी सत्याच्या आजाराबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल सांगितलेलं.

काय म्हणालेले महेश मांजरेकर?

Loading...

महेश मांजरेकर म्हणालेले की, ‘तो खूप चांगला मुलगा आहे. मला कधीतरी वाटतं ना, आताच्या समाजात तो शोभून दिसत नाही. त्याला कुणाविषयी वाईट विचार करता येत नाही. काही झालं की तो इमोशनल होतो. तो खूप साधा आहे. त्याला ADHD (Attention-deficit/hyperactivity disorder) आहे. त्यामुळे त्याला शिकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम यायचा. तो खूपच भोळा आहे. तो कुणालाही ठरवून दुखावणारा नाहीये. चिडला की खूप चिडतो. पण तो जसा आहे, तसं मी त्याला स्वीकारलं आहे. तो जसा आहे तसा तो मला आवडतो.’

‘आमच्यातील संवाद खूप चांगला आहे. त्याला अभिनय करायचा होता. पण, मी त्याला समजावलं की नको. म्हणजे मला वाटलं असतं ना, हा जबरदस्त अभिनेता आहे तर मी केलं असतं. मी त्याला समजावलं, तुला या क्षेत्रात काही करता आलं तर कर पुढे. त्याला मी म्हटलं आता तू सध्या बिझनेस सांभाळ. पण त्यानं ऐकलं. मी त्याच्यासाठी कायमच असेन.’ असं महेश मांजरेकर शेवटी म्हणाले होते. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर बोलत होते.

 

दरम्यान, सत्या मांजरेकरनं ‘जाणिवा‘, ‘आई‘, ‘पोर बाजार‘, ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us