Makarand Anaspure : नानांचा ‘तो’ डायलॉग आईसमोर बोललो अन् तिनं पळी फेकून मारली…मकरंद अनासपुरे यांनी सांगितला किस्सा

Makarand Anaspure : मकरंद अनासपुरे यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्यासंबंधी एक किस्सा सांगितला आहे.

Makarand Anaspure : नानांचा तो डायलॉग आईसमोर बोललो अन् तिनं पळी फेकून मारली...मकरंद अनासपुरे यांनी सांगितला किस्सा
| Updated on: Oct 19, 2026 | 3:46 PM

नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नाना पाटेकरांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान मकरंद अनासपुरे भावुक झाले होते. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्यात खूप चांगली मैत्री होती. एका जुन्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी नाना पाटेकर यांचा किस्सा सांगितला होता.

मकरंद अनासपुरे यांनी सांगितला किस्सा

Loading...

मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘1994 मध्ये ‘कल्पना एक अविष्कार अनेक‘ अशा नावाची एकांकिका स्पर्धा सुधीर दामले यांनी सुरू केलेली. 25 वर्षे नाट्यदर्पणची आणि त्याशिवाय नाट्यदर्पण रजनीसुद्धा त्या काळात खूप प्रसिद्ध होती. त्या स्पर्धेत बक्षीस मिळणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. हे व्यावसायिकचं झालं. हौशी मंचावर ‘कल्पना एक अविष्कार अनेक‘ ही वेगळी एकांकिका स्पर्धा घेतली जायची. ज्यामध्ये मान्यवर एक विषय द्यायचे आणि त्यावर सगळ्यांनी एकांकिका सादर करायची. त्यावेळी आम्हाला नवलकरांनी ‘आधार‘ हा विषय दिलेला. यावर दोन सेंटरवर ही स्पर्धा व्हायची आणि तीन राउंडमध्ये व्हायची. त्यावर्षी मुंबई आणि पुणे मिळून 250 पेक्षा जास्त एकांकिका झालेल्या. त्या तालीम स्वरूपाच्या असायच्या. पुण्यातील प्राथमिक फेरीत माझी निवड झाली.’

‘पुणे आणि मुंबईमध्ये मिळून आठ एकांकिका झालेल्या, त्याची अंतिम फेरी नेहरू सेंटरला झालेली. त्यावेळी पारितोषिक वितरणाचे प्रमुख म्हणून नाना पाटेकर आले होते. त्या काळात नाना पाटेकर म्हणजे मराठीतील खणखणीत नातं होतं. आमची एकांकिका शेवटची होती. मी फेऱ्या मारत होतो, तेवढ्यात नाना पाटेकर आले आणि त्यांनी मला नाना पाटेकरांनी मला एकांकिकेबद्दल विचारलं. मी लहानपणापासून नाना पाटेकरांचा फॅन होतो. त्यांचा ‘सावित्री‘ हा सिनेमा मी पाहिलेला आणि मला तो खूप आवडलेला. मी आईसमोर त्या सिनेमातील नानांचा ‘चांगला चाललाय शेजार धर्म‘ हा डायलॉग मी आईला बोलायचो. तेव्हा आईने मला पळी फेकून मारलेली आणि ती तुटलेली.’

‘त्यानंतर नानांनी मला मुंबईत बोलावलं आणि मला मदत केली. माझ्या करिअरची सुरुवात नानांमुळे झाली. त्यांच्या ‘यशवंत‘ या सिनेमात छोटीशी भूमिका साकारलेली. म्हणून मी त्यांना गुरु मानतो.’ असं मकरंद अनासपुरे यांनी शेवटी सांगितलं. ‘अभिजात मराठी फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे बोलत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us