Mika Singh : दलेर मेहंदींच्या अपमानावरून मिका सिंह आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे मंत्री सुबोध उनियाल यांच्या माफीची केली मागणी, म्हणाला….

गायक दलेर मेहंदी यांच्यावर भर कार्यक्रमात आरोप करणारे उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्याविरोधातील वाद आता आणखी वाढला आहे. दलेर मेंहंदी यांचे भाऊ आणि गायक मिका सिंह यांनी थेट उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे धाव घेतली आहे.

Mika Singh : दलेर  मेहंदींच्या अपमानावरून मिका सिंह आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे मंत्री सुबोध उनियाल यांच्या माफीची केली मागणी, म्हणाला....
MIKA SINGH
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 23, 2026 | 7:36 PM

गायक दलेर मेहंदी यांच्यावर भर कार्यक्रमात आरोप करणारे उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्याविरोधातील वाद आता आणखी वाढला आहे. दलेर मेहंदी यांचे भाऊ आणि गायक मिका सिंह यांनी थेट उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे धाव घेतली आहे. सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांच्याबद्दल केलेल्या वतव्याबद्दल स्पष्टीकरण आणि माफी मागावी अशी मागणी केली आहे. कलाकारांचा अशा प्रकारे सार्वजनिक व्यासपीठावर अपमान होत असेल, तर त्यांनी उत्तराखंडमध्ये कार्यक्रम करण्यासाठी यावं तरी का असा सवालही मिका सिंह यांनी उपस्थित केला आहे.

 

Loading...

नेमका काय म्हणाला ‘मिका सिंह’

मिका सिंह यांनी दलेर सिंह यांच्या समर्थनार्थ केलेल्या वतव्यावरून त्याचा राग स्पष्टपणे दिसून येत आहे. एक्सवर ट्विट करत त्याने सुबोध उनियाल यांच्यावर एक प्रकारे हल्ला देखील चढवला होता. त्यात त्या मंत्र्‍याने दिलेर मेहंदी यांची व्हिडिओ पोस्ट करून माफी मागावी असे देखील मिका सिंह याने म्हटले होते.परंतु आता मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनीही या वादार हस्तक्षेप केला आहे.

मुख्यंमंत्री धामी यांनी मिका सिंग यांच्याशी संपर्क साधला. दलेर मेंहंदी यांच्याविषयी जो वाद झाला त्याबद्दल चौकशी केली. या वादातून निर्माण होणार गैरसमज परस्पर संवादातून सोडवले जावेत असा मुख्यमंत्र्‍यानी आग्रह धरला होता. एक्सवर मिकाने याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री आणि त्यांच्यातील चर्चेविषयी माहिती दिली.

 


मिका पोस्ट करत म्हणाला की, ” मला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामीजी यांच्याबद्दल खूप आदर आहे. दलेर भाई प्रकरणासंदर्भात त्यांनी मला स्वत:हून फोन केला होता. मी त्यांच्या प्रयत्नांची मनापासून प्रशंसा करतो. मी धामी साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. ते खूप साधे आहेत आणि जमिनीवर पाय असलेले व्यक्ती आहेत आणि मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे.
माझी एक छोटीशी विनंती आहे, सुबोध उनियाल यांना सांगा कि त्यांनी एक छोटा व्हिडिओ बनवून आपल्या वतव्यावर स्पष्टिकरण द्यावे आणि कार्यक्रमादरम्यान दलेर भाई दारूच्या नशेत होते असे म्हटल्याबद्दल माफी मागावी. माझा विश्वास आहे कि गैरसमज होऊ शकतात पण ते सामंजस्याने सोडवले जाऊ शकतात. मला आशा आहे की या छोट्याश्या पावलामुळे हे प्रकरण मिटण्यास आणि दलेर भाईंचा आदर आणि प्रतिष्ठा जपण्यास मदत होईल.माझा धामी साहेबांच्या नेतृत्वावर आणि बुद्धीमत्तेवर पूर्ण विश्वास आहे.” असे मिका सिंह म्हणाला.

 

 

उत्तराखंडमधील नरेंद्रनगर येथे सिद्धपीठ मां कुजांपुरी पर्यटन आणि विकास मेळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दलेर मेहंदी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असताना मंत्री सुबोध उनियाल मंचावर आले आणि त्यांनी दलेर मेहंदी यांच्या सादरीकरणावर आक्षेप घेतला. तसेच त्यांच्यावर मद्यपान करून आल्याचा आरोपही केला. यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us