Malaika Arora : भर कार्यक्रमात 4 वर्षांनी मोठ्या मलायकाला मिका सिंगनं घातली लग्नाची मागणी? गायक म्हणाला, माझ्यापेक्षा श्रीमंत…

Malaika Arora And Mika Singh : एका कार्यक्रमातील मलायका अरोरा आणि मिका सिंग यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Malaika Arora : भर कार्यक्रमात 4 वर्षांनी मोठ्या मलायकाला मिका सिंगनं घातली लग्नाची मागणी? गायक म्हणाला, माझ्यापेक्षा श्रीमंत...
| Updated on: Oct 25, 2026 | 8:37 PM

सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना मोहित करते. ती जिथे कुठे जाते, तिथे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. नुकतीच, मलायका एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तिथं उपस्थित असलेल्या हजारो लोकांमध्ये, सर्वांचं लक्ष तिच्यावर होतं. या कार्यक्रमात मिका सिंगही उपस्थित होता. त्यानं मंचावर मलायकाला असं काहीतरी म्हटलं, ज्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले. मलायका अरोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Loading...

मलायका अरोराचा व्हिडिओ व्हायरल

पुरस्कार सोहळ्यात मलायका अरोरा आणि मिका सिंग एकत्र मंचावर आले. मलायकाला पाहून मिका ‘मुझसे शादी करोगी’ हे गाणं गायला. दुसरीकडे, मलायकानं ‘नाही… नाही…’ असं खूणावलं. त्यानंतर मिकानं मलायकाला सांगितलं की, तिला त्याच्याइतका श्रीमंत माणूस सापडणार नाही. इथे सगळे गरीब आहेत. हे ऐकून मलायका हसली आणि तिनं त्याला मिठी मारली. त्यानंतर मिका म्हणाला, ‘मलायकासाठी टाळ्यांचा कडकडाट करा.’

मिका आणि मलायका यांच्यातील या गंमतीनं चाहत्यांचं मन जिंकलं. एका चाहत्यानं लिहिलं, ‘मिका राजा आहे.’ दुसऱ्यानं हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली. एका दुसऱ्या युझरनं ‘अर्जुन कपूर’ आणि हसणारा इमोजी, अशी कमेंट केली. काहींनी कमेंट केली की, मिकानं गंमतीनं सत्य सांगितलं आहे. अनेकांनी, ‘मॅडम, लग्न करा!’ अशी कमेंट केली. अनेकांनी या जोडीला नंबर वन म्हटलं.

 

मिका सिंग आणि मलायका अरोरा यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास, मिका ४९ वर्षांचा असून अविवाहित आहे. दुसरीकडे, मलायका ५३ वर्षांची असून हिऱ्यांचा व्यापारी हर्ष मेहतासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर अर्जुन आणि मलायका यांचा ब्रेकअप झाला. मात्र, तिनं पुन्हा लग्न केलं नाही.

दरम्यान, मिका सिंग आपल्या गाण्यांमुळे पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे, मलायका अरोरा रिॲलिटी शो आणि कार्यक्रमांमध्ये व्यग्र असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us