ट्रॅफिकमध्ये मुकेश अंबानी यांनी लग्नासाठी केलं होतं प्रपोज; उत्तर देताना नीता म्हणाल्या..

| Updated on: Mar 16, 2024 | 3:27 PM

नीता आणि मुकेश अंबानी यांनी 1985 मध्ये लग्न केलं. या दोघांना आकाश, ईशा आणि अनंत अंबानी ही तीन मुलं आहेत. या मुलाखतीत नीता यांनी त्यांच्या पहिल्या नोकरीविषयीही सांगितलं होतं. सनफ्लॉवर नर्सरीमध्ये शिक्षिका म्हणून काम करताना दर महिन्याला 800 रुपये मिळत असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

ट्रॅफिकमध्ये मुकेश अंबानी यांनी लग्नासाठी केलं होतं प्रपोज; उत्तर देताना नीता म्हणाल्या..
Mukesh and Nita Ambani
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 16 मार्च 2024 | रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत ते नीता अंबानी यांच्यासोबतच्या लग्नाविषयी बोलताना दिसत आहेत. सेलिब्रिटी होस्ट सिमी गरेवाल यांनी मुकेश आणि नीता अंबानी यांची ही मुलाखत घेतली आहे. नीता अंबानी यांना लग्नासाठी केव्हा आणि कशी मागणी घातली होती, याविषयीचा खुलासा मुकेश अंबानी यांनी या मुलाखतीत केला. एकेदिवशी मुंबईतल्या पेडर रोड इथून जाताना दोघं ट्रॅफिकमध्ये अडकले होते. तेव्हा दोघं एकमेकांना फक्त तीन आठवड्यांपासून ओळखत होते. मुंबईतल्या ट्रॅफिकदरम्यान मुकेश अंबानी यांनी नीता यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

सिमी गरेवाल यांच्याशी बोलताना ते म्हणाले, “लग्नासाठी मुली पाहताना मी सर्वांत आधी नीतालाच भेटलो. तिला भेटल्यावर मी ठरवलं होतं की तीच माझी जोडीदार बनू शकते. एकदा आम्ही पेडर रोडवरून जात होतो तेव्हा अचानक मला तिला लग्नासाठी विचारावं असं सुचलं. म्हणून ट्रॅफिकमध्ये गाडी थांबवली असतानाच मी तिला विचारलं की, नीता तू माझ्याशी लग्न करशील का? फक्त हो किंवा नाही म्हण.”

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी यांनी अचानक विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना नीता अंबानी यांनी आधी हो किंवा नाही असं काहीच म्हटलं नव्हतं. त्यांच्या तोंडून सर्वांत आधी हेच निघालं की, “मुकेश, पुढे चल.” कारण त्यावेळी ट्रॅफिक जॅममध्ये आम्ही होतो आणि आमच्यामागील गाड्या हॉर्न वाजवून ओरडत होते की पुढे चला. मात्र नीता यांचं उत्तर ऐकण्यासाठी मुकेश अंबानी अडून बसले होते. “तू मला फक्त हो किंवा नाही सांग. त्याशिवाय मी गाडी इथून हलवणार नाही,” असं ते म्हणाले.

मुकेश अंबानी यांना लग्नासाठी नीता यांना तीन वेळा विचारावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रपोजलचा स्वीकार केला. यानंतर नीता यांनी मुकेश यांना असंही विचारलं की मी नकार दिला असता तर काय केलं असतं? “जर मी त्याठिकाणी लग्नासाठी नकार दिला असता तर तू मला तेव्हाच्या तेव्हा गाडीतून उतरण्यास सांगितलं असतं का? आणि तू तिथून निघून गेला असता का”, असं त्या विचारतात. यावर उत्तर देताना मुकेश अंबानी म्हणाले, “नाही, मी तुला तुझ्या घरी सोडलं असतं आणि त्यानंतर आपण मित्र म्हणून राहिलो असतो.”