Nana Patekar : संपूर्ण शरीराला आग लागलेली, दोन महिने…शूटिंगदरम्यान नाना पाटेकरांचा झालेला मोठा अपघात, सांगितलेला प्रसंग

Nana Patekar Accident : नाना पाटेकर यांनी एका जुन्या मुलाखतीत सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे. एका सिनेमाच्या शूटिंगला नाना पाटेकर यांचा अपघात झालेला.

Nana Patekar : संपूर्ण शरीराला आग लागलेली, दोन महिने...शूटिंगदरम्यान नाना पाटेकरांचा झालेला मोठा अपघात, सांगितलेला प्रसंग
| Updated on: Oct 15, 2026 | 8:26 PM

दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून मेहनत घेतली आहे. त्यांचे काही सिनेमे आजही चाहते आवडीनं पाहतात. पण, तुम्हाला माहित आहे का? अशाच एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांचा अपघात झालेला. नाना आगीत भाजले होते. याबद्दल त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

नाना पाटेकर यांचे  ‘क्रांतिवीर’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘परिंदा’ हे सिनेमे आजही पहिले जातात. ‘परिंदा‘ सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर खरोखरच भाजले होते. यामुळे त्यांची दाढी, पापण्या आणि अगदी त्वचाही आगीत जळाली होती. त्यामुळे त्यांनी एक वर्ष काम केलं नाही. ‘परिंदा’ सिनेमात नाना पाटेकर यांनी अण्णाची भूमिका साकारली होती. यापूर्वी जॅकी श्रॉफ ही भूमिका साकारणार होते. सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये नाना पाटेकर यांचं पात्र जळताना दाखवलं जाणार होतं. त्यावेळी डिजिटल आग नसल्यानं दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी सेटवर खरी आग लावण्याची व्यवस्था केली. पण, नाना पाटेकर खरोखरच या आगीत जळाले होते आणि अनेक महिने अंथरुणाला खिळले होते.

Loading...

नाना पाटेकर यांनी सांगितलेला प्रसंग

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर म्हणालेले की, ‘परिंदा’मधील ज्या सीनमध्ये माझ्या शरीराला आग लागते, त्यात माझ्या संपूर्ण शरीराला खरोखरच आग लागली. मला दोन महिने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझी चामडीही जळाली. सर्व काही जळालं. दाढी, मिशा, पापण्या, सर्व काही जळालं. मी सहा महिने असाच होतो. पहिल्या टेकमध्ये आम्ही तीन बादल्या ओतल्या, दुसऱ्या टेकमध्ये आम्ही १४ बादल्या ओतल्या. आग खूप मोठी होती. तो एक मोठा अपघात होता.’ असंही नाना पाटेकर पुढे म्हणाले होते.

 

तसेच ‘सलाम बॉम्बे’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही नाना पाटेकर यांचा अपघात झालेला. सिनेमातील एका प्रसंगात नाना पाटेकर यांच्यावर चाकूनं हल्ला होतो, असं दाखवण्यात आलं आहे. हा सीन शूट करताना नानांना खरोखर चाकू लागलेला आणि रक्त यायला लागलेलं, याबद्दलही नाना पाटेकर यांनी सांगितलेलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us