
इंटरनेट सेन्सेशन नोरा फतेहीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नोराची जबरदस्त फॅशन दिसत आहे.

नेहमीच हटके कपड्यांमध्ये दिसणाऱ्या नोराचं हे फोटोशूट पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे. एका चाहत्यानं लिहिलं, 'नोरा रणवीरला टक्कर देत आहे.' तर दुसर्यानं लिहिलं, 'रणवीरही नोरापेक्षा मागे आहे.'

नोरा फतेहीचे हे फोटो एका थीम शूटचा भाग आहेत. एका आंतरराष्ट्रीय फोटोग्राफरनं तिचे हे फोटो क्लिक केले आहेत.

या फोटोंमध्ये नोरा फतेही अप्रतिम पोझ देत आहे. तिचा हा सुंदर अंदाज यात स्पष्टपणे दिसून येतोय. प्रत्येक फोटोत नोरा स्वत:ला बॅलेंस करताना दिसत आहे.

नोरा फतेही या फोटोंमध्ये कलरफफुल अंदाजात दिसत आहे. नोरानं या शूटचा खूप आनंद लुटलेला दिसतोय.