Nushrratt Bharuccha : नुसरत भरुचा एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईत दाखल, अभिनेत्रीची अवस्था बघून चाहते चिंतेत, फोटो व्हायरल

Nushrratt Bharuccha Health Update : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा बालीमध्ये अपघात झालेला. अभिनेत्रीला शस्त्रक्रियेसाठी मुंबई आणण्यात आलं आहे.

Nushrratt Bharuccha : नुसरत भरुचा एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईत दाखल, अभिनेत्रीची अवस्था बघून चाहते चिंतेत, फोटो व्हायरल
| Updated on: Oct 02, 2026 | 9:27 PM

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा बालीमध्ये झालेल्या एका अपघातात पाठीच्या कण्याला दुखापत झाली. पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेसाठी ती बालीहून मुंबईला परतली आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीवर मुंबईतील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाईल.

नुसरत भरुचाचे फोटो व्हायरल

Loading...

नुसरत भरुचाला विमानानं मुंबईला आणण्यात आलं. ती कामासोबतच सुट्टीसाठी बालीला गेली होती. तिथं तिचा अपघात झाला आणि तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं, ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नुसरतच्या पाठीच्या कण्यावर आता मुंबईत शस्त्रक्रिया केली जाईल, म्हणूनच अभिनेत्रीला विमानानं मुंबईला आणण्यात आलं.

मुंबईतील नुसरत भरुचाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती शुद्धीवर असून इतरांशी बोलत असल्याचं दिसत आहे, पण ती व्हेंटिलेटरवर आहे. तिची प्रकृती गंभीर दिसत होती. अभिनेत्रीची अवस्था बघून तिचे चाहते चिंतेत आहेत.

नुसरत भरुचाच्या टीमनं यापूर्वी अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. अभिनेत्रीला दुखापतीतून आणि शस्त्रक्रियेतून बरं होण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असेल. याचा तिच्या भविष्यातील कामावर परिणाम होईल. पण, नुसरतला ही दुखापत कशी झाली हे उघड केलं गेलं नाही. नुसरत पुढील उपचारांसाठी मुंबईत परतली आहे आणि तिच्या पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया कधी केली जाईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

नुसरत भरुचाच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेत्री टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणार होती. ही घटना घडण्यापूर्वी ती त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करताना दिसली असती. अद्याप या चित्रपटाचं शीर्षक समजलेलं नाही. ती शेवटची ‘उफ्फ ये सियापा’ या कॉमेडी-ड्रामामध्ये दिसली होती आणि हा सिनेमा 5 सप्टेंबर 2026  रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. नुसरत भरुचानं 2006 मध्ये आलेल्या ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर ती ‘कल किसने देखा’, ‘ताजमहाल’ आणि ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटांमध्ये दिसली. 2011 मध्ये आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटानं तिला प्रसिद्धी मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us