Pallavi Chatterjee : 15 वर्षांच्या रेखा, शूटिंगदरम्यान अभिनेत्यानं केलेलं बळजबरी किस; अभिनेत्याची लेक म्हणाली, विचित्र…

Pallavi Chatterjee : 'दो शिकारी' सिनेमातील रेखा आणि बिस्वजीत यांच्या रोमँटिक सीनची चर्चा झालेली. अशातच आता बिस्वजित यांची मुलगी पल्लवी चॅटर्जीनं या सीनबद्दल भाष्य केलं आहे.

Pallavi Chatterjee : 15 वर्षांच्या रेखा, शूटिंगदरम्यान अभिनेत्यानं केलेलं बळजबरी किस; अभिनेत्याची लेक म्हणाली, विचित्र...
| Updated on: Oct 11, 2026 | 9:56 PM

अनेक वर्षांपूर्वी, ‘दो शिकारी’ चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि बिस्वजीत चॅटर्जी यांच्या एका किसिंग सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या सीनवर आजही चर्चा होते. या घटनेबद्दल बिस्वजीत यांची मुलगी आणि अभिनेत्री पल्लवी चॅटर्जीनं भाष्य केलं आहे. ‘हिंदी रश’ पॉडकास्टमध्ये जेव्हा तिला वडिलांच्या सीनबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिनं सुरुवातीला यावर बोलण्यास नकार दिला.

काय म्हणाली अभिनेत्री?

Loading...

पुढे पल्लवी चॅटर्जी म्हणाली, ‘तुमच्या वडिलांनी कोणासोबत काय केलं, तुमच्या आईनं कोणासोबत काय केलं, अशा प्रश्नांची उत्तरं देणं मुलांसाठी खूप विचित्र आणि लाजिरवाणं आहे. त्यांनाच विचारा किंवा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना. जे तिथे होते त्यांना विचारा. शक्य असल्यास, रेखाजींना विचारा.’

किसिंग सीनच्या वादावर तिच्या पूर्वीच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता, पल्लवीनं स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली, ‘माझं म्हणणं आहे की, जर असं कोणासोबतही घडलं, तर ते चुकीचं आहे. एकदा संमती घ्यायलाच हवी, मग ती तिची असो वा इतर कोणाचीही. पण ते योग्य होतं की, अयोग्य, हे सांगण्याचा मला अधिकार नाही, कारण नेमकं काय घडलं हे मला माहीतच नाही.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी या आधीच्या मुलाखतींमध्येही सांगितलं आहे की, जर हे खरंच घडलं असेल, तर त्यांनी संमती घ्यायला हवी होती. मी असं काही कधीच पाहिलं नाही, आणि जर इंडस्ट्रीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काही घडलं असतं… तर कदाचित काहीतरी घडलं असतं, मला माहीत नाही. असं काही घडलं नाही असं मी म्हणत नाही.’

दरम्यान, रेखा त्यावेळी 15-16 वर्षांच्या होत्या. आणि नुकताच त्यांना बिस्वजीत चॅटर्जी यांच्यासोबत पहिला चित्रपट मिळाला होता. २०१६ मध्ये, रेखा यांचं ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या पुस्तकात ‘दो शिकारी‘ या सिनेमातील किसिंग सीनबद्दलही लिहिण्यात आलं आहे. अभिनेत्रीच्या आत्मचरित्रानुसार, ‘दो शिकारी’ मधील एका रोमँटिक, सीनदरम्यान बिस्वजीत यांनी रेखा यांच्या परवानगीशिवाय त्यांना किस केलं आणि पाच मिनिटे ते सुरूच ठेवलं. रेखा यांनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण बिस्वजीत यांनी अभिनेत्रीला सोडलं नाही. या सीननंतर रेखा रडत होत्या, तर सेटवरील लोकांनी टाळ्या वाजवल्या.

हा सीन कुलजीत पाल दिग्दर्शित ‘दो शिकारी’ मध्ये शूट करण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपांमुळे ‘दो शिकारी’ जवळपास 10 वर्षानंतर प्रदर्शित झाला. सेन्सॉर बोर्डानं त्यातील बोल्ड आणि रोमँटिक सीन आक्षेपार्ह ठरवून सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. जवळपास 10 वर्षानंतर अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी, चित्रपटात अनेक बदल करण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us