अंबानी कुटुंबाचा विषय खोल, या व्यक्तीकडे 1700 हिऱ्यांचे घड्याळ, किंमत वाचून चकित व्हाल

Radhika Merchant Watch : अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंटने असे लक्झरी घड्याळ घातले होते, ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंबानी कुटुंबाचा विषय खोल, या व्यक्तीकडे 1700 हिऱ्यांचे घड्याळ, किंमत वाचून चकित व्हाल
radhika merchant patek philippe Watch
Image Credit source: Google
| Updated on: Sep 07, 2026 | 9:04 PM

अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट आपल्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या एका सेलिब्रेशन कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात राधिका अतिशय सुंदर दिसत होती. तिने पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाचा आकर्षक एम्ब्रॉयडरी असलेला आउटफिट परिधान केला होता. या ड्रेसवर फुलांची बारीक नक्षी होती. त्यासोबत तिने मिनिमल पण अतिशय लक्झरी अॅक्सेसरीजची निवड केली होती. मात्र, तिच्या आउटफिटपेक्षा तिच्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राधिकाने असे लक्झरी घड्याळ घातले होते, ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हिरे आणि मौल्यवान रत्नांनी जडलेले घड्याळ

राधिका मर्चंटच्या हातात असलेले हे घड्याळ 18 कॅरेट व्हाइट गोल्डपासून बनवलेले दुर्मीळ पाटेक फिलिप टाइमपीस असल्याचे सांगितले जात आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य केवळ त्यासाठी वापरण्यात आलेल्या मौल्यवान धातूमध्येच नाही, तर त्यावरील अप्रतिम जडाऊ कारागिरीतही आहे. घड्याळाचा केस आयताकृती असून तो 18 कॅरेट व्हाइट गोल्डपासून बनवण्यात आला आहे. त्याची रुंदी सुमारे 24 मिलिमीटर, तर लांबी 27.8 मिलिमीटर आहे. घड्याळाच्या डायलवर हिरे आणि एमराल्ड जडवण्यात आले आहेत. 12 आणि 6 या क्रमांकांच्या जागी रोमन अंकांचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे घड्याळाला अतिशय क्लासी लूक मिळतो.

1,700 हून अधिक मौल्यवान हिरे

अहवालानुसार, या खास घड्याळामध्ये 1,700 हून अधिक हिरे आणि एमराल्ड जोडण्यात आले आहेत. घड्याळाची सर्वात खास बाब म्हणजे त्यावरील मौल्यवान रत्नांची जडणघडण. यामध्ये सुमारे 33.64 कॅरेटचे 864 बॅगेट-कट हिरे जडवलेले आहेत. याशिवाय सुमारे 1.62 कॅरेटचे आणखी 855 हिरे लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर घड्याळात 54 मार्कीज-कट एमराल्ड असून त्यांचे वजन सुमारे 1.29 कॅरेट आहे. यासोबतच सुमारे 1.69 कॅरेटचे आणखी 241 एमराल्डही जडवण्यात आले आहेत.

थक्क करणारी किंमत

द इंडियन हॉरोलॉजीच्या इन्स्टाग्राम पेजनुसार, या खास टाइमपीसची भारतीय रुपयांमध्ये किंमत सुमारे 1.51 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. एवढी मोठी किंमत असल्याने हे घड्याळ जगातील लक्झरी टाइमपीसमधील एक महागडे घड्याळ ठरते. अशा प्रकारची घड्याळे ऑर्डर देऊनही तयार करून घेतली जातात. राधिका यापूर्वीही अशा लक्झरी घड्याळांसह दिसली आहे. त्यामुळे तिला स्टाइलसोबतच महागड्या आणि लक्झरी वस्तूंचीही आवड असल्याचे दिसून येते.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

राधिका मर्चंटच्या या घड्याळाचे फोटो आणि त्याची किंमत सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, एवढ्या पैशांमध्ये तीन महागड्या गाड्या किंवा एखादा मोठा बंगला खरेदी करता येऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us