Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या MRI रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, ‘मेंदूच्या नसा दाबल्या गेल्याने..’

| Updated on: Aug 14, 2022 | 6:02 PM

13 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता केलेल्या एमआरआयमध्ये राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूमध्ये काही समस्या असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती बरी होण्यासाठी आणखी 10 दिवस लागू शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या MRI रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, मेंदूच्या नसा दाबल्या गेल्याने..
Raju Srivastava
Image Credit source: Instagram
Follow us on

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीशी संबंधित काही ताजे अपडेट्स समोर येत आहेत. त्यांचा एमआरआय रिपोर्ट (MRI) आला असून त्यात मोठा खुलासा झाला आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स (Delhi AIIMS) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी डॉक्टरांचं पथक उपचार करत आहेत. दरम्यान त्यांचा भाऊ दीपू याने सांगितलं की, राजू यांचा एमआरआय रिपोर्ट आला असून, त्यात त्यांच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. त्यांना बरं होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. डॉक्टरांनी राजू यांचा एमआरआय केला होता, ज्याचा अहवाल आता समोर आला आहे. 13 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता केलेल्या एमआरआयमध्ये राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूमध्ये काही समस्या असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती बरी होण्यासाठी आणखी 10 दिवस लागू शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

राजू यांचा भाऊ काजू यांनासुद्धा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. तसंच राजू यांचे अनेक नातेवाईकही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. राजू यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर चिंता व्यक्त होत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी त्याबद्दल माहिती दिली. राजू यांची प्रकृती स्थिर असून फेक न्यूजकडे दुर्लक्ष करा अशी विनंती त्यांनी केली आहे. राजू यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी पोस्ट लिहिण्यात आली. “राजू यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. सोशल मीडियावर पसरणाऱ्या फेक न्यूजकडे (Fake News) कृपया दुर्लक्ष करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा”, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर करण्यात आली.

पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.

हे सुद्धा वाचा