Rakhi Sawant : मला माझं शरीर विकायचं…राखी सावंतचा कास्टिंग काऊचबद्दल खुलासा
Rakhi Sawant : राखी सावंतनं नुकत्याच एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील तिच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितलं आहे.

राखी सावंत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. नुकत्याच एका मुलाखतीत राखीनं तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की, जेव्हा ती नायिका बनण्याचं स्वप्न घेऊन इंडस्ट्रीत आली, तेव्हा ती खूप भोळी होती आणि तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या काळात काही लोकांनी अयोग्य वर्तन केलं आणि तिला बेडरूममध्ये ओढण्याचा प्रयत्न केला, असंही अभिनेत्री म्हणाली.
राखी सावंतने शार्दुलच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जेव्हा राखीला विचारण्यात आलं की, ती अजूनही लोकांकडून तिच्या हक्कांची मागणी का करत नाही, तेव्हा ती म्हणाली, ‘मला अजूनही माझ्या लहानपणापासून भीती वाटते. जेव्हा मी नायिका बनण्यासाठी, आयटम गर्ल बनण्यासाठी गेले, तेव्हा लोक मला बेडरूम दाखवायचे.’
‘मी घाबरले आहे. लोकांनी माझ्यासोबत असं केलं. मला बेडरूम दाखवली, जेवायला जाऊया सांगायचे. मी निरागस आहे, फार शिकलेली नाही. आज जर कोणी मला हे दाखवलं, तर मी माझी चप्पल काढून त्यांना एक सणसणीत चपराक देईन. मी त्या काळातली राखी सावंत होते, निरागस आणि घाबरलेली.’ राखीनं पुढे स्पष्ट केलं की, त्या काळाची भीती आजही तिच्या मनात घर करून आहे.
राखी म्हणाली, ‘मी माझं शरीर विकणार नाही.’
राखीला जेव्हा विचारण्यात आलं की, तिनं आपल्या हक्कांची मागणी का केली नाही किंवा ती आजही शाहरुख खानसारख्या मोठ्या स्टार्सपेक्षा स्वतःला कमी का समजते? यावर राखी म्हणाली, ‘मी लहानपणापासून घाबरलेली आहे. ती भीती, ती दहशत आजही माझ्यात आहे. मी माझी कॉमेडी विकेन. मी माझं शरीर विकणार नाही. जसं म्हणतात तसं मी स्वतःला विदूषक बनवेन. मी लोकांना हसवेन. मी लोकांचं मनोरंजन करेन. पण मी माझं शरीर विकणार नाही. मला माझं शरीर विकायचं नाही.’
भारतीय माध्यमांनी तिला इतकं प्रसिद्ध केलं की, आज भारतात तिच्याकडे काहीही नसतानाही ती दुबईमध्ये शेख आहे, असंही राखी शेवटी म्हणाली.