Ramayana : ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ‘रामायण’नं गाठला कोट्यवधींचा पल्ला, 1 लाखापेक्षा जास्त तिकीट विक्री, केली बक्कळ कमाई
Ramayana Advance Booking : रणबीर कपूरच्या 'रामायण' या सिनेमानं ऍडव्हान्स बुकिंगमध्येच कोट्यवधींची कमाई केली आहे.

‘रामायण’ हा केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रभू रामाची कथा सांगणारा हा चित्रपट जगभरात आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग आता सुरू झालं आहे. सिनेमानं ॲडव्हान्स बुकिंगमध्येच भरघोस कमाई केली आहे.
‘रामायण’नं ऍडव्हान्स बुकिंगमध्ये 5.96 कोटी कमावले
‘रामायण’ सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालं. SACNILC च्या अहवालानुसार, चित्रपटानं आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमधून 5.96 कोटींची कमाई केली आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. ब्लॉक केलेल्या जागा वगळता, हा आकडा 3.92 कोटी असेल. हिंदी आवृत्तीनं 5.44 कोटी, तेलुगू आवृत्तीनं ६६,९०० आणि कन्नड आवृत्तीनं 29.99 लाख कमावले आहेत.
1 लाखांहून अधिक तिकिटं विकली
आजपर्यंत ‘रामायण’साठी एकूण 1.02 लाख तिकिटे ॲडव्हान्स बुक झाली आहेत. ही तिकिटं 3,578 शोसाठी विकली गेली आहेत. वृत्तानुसार, मुंबईत ‘रामायण’च्या तिकिटाची किंमत 2,770 वर पोहोचली आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये चित्रपटासाठी प्रचंड क्रेझ दिसून येत आहे.
भारतातील दोन मोठे स्टार, रणबीर कपूर आणि यश, ‘रामायण’मध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिसतील. ‘KGF’ आणि ‘KGF 2’ सारख्या चित्रपटांमुळे जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या यशनं ‘रामायण’मध्ये लंकेचा राजा रावणाची भूमिका साकारली होती. ‘ॲनिमल’ स्टार रणबीर कपूर या चित्रपटात भगवान श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेनं भरतची भूमिका साकारली आहे. आदिनाथला ‘रामायण‘ या सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘रामायण’ दिवाळीत प्रदर्शित होणार
‘रामायण’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर, ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा दोन भागांचा चित्रपट 4,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित या चित्रपटात रवी दुबे, सनी देओल, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंग आणि साई पल्लवी यांच्यासह इतर अनेक नामवंत कलाकार आहेत.