Ranjana Deshmukh : 10-12 फुटांवर पडलेला स्वतःचा हात ती सरकत जाऊन…रंजना देशमुख यांचा झालेला अपघात, लेखिकेनं सांगितला प्रसंग

Ranjana Deshmukh Accident : रंजना देशमुख यांचा मोठा अपघात झालेला. याबद्दल पत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं.

Ranjana Deshmukh : 10-12 फुटांवर पडलेला स्वतःचा हात ती सरकत जाऊन...रंजना देशमुख यांचा झालेला अपघात, लेखिकेनं सांगितला प्रसंग
| Updated on: Oct 19, 2026 | 9:01 PM

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर चाहत्यांची मनं जिंकली. आजही रंजना यांचे सिनेमे आवर्जून पाहिले जातात. पण, एक वेळ अशी आली जेव्हा रंजना यशाच्या शिखरावर होत्या आणि त्यांचा मोठा अपघात झाला. या अपघातानंतर रंजना यांचं करिअर उद्ध्वस्त झालं. मात्र, तरीही रंजना यांनी हार मानली नाही. एका मुलाखतीत सुप्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार अनिता पाध्ये यांनी रंजना देशमुख यांच्या अपघाताचा प्रसंग सांगितला आहे.

अनिता पाध्ये यांनी सांगितला प्रसंग

Loading...

1989 मध्ये ‘झुंजार‘ या सिनेमाचं शूटिंग होतं. या सिनेमाच्या शूटिंगसाठी रंजना बेंगलोरला निघालेल्या. दुर्दैवानं रंजना यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात रंजना यांचे दोन्ही पाय निकामी झाले आणि एक हात जखमी झाला. या अपघाताबद्दल बोलताना अनिता पाध्ये म्हणाल्या की, ‘जेव्हा व्ही. शांताराम यांचं निधन झालं, तेव्हा आम्ही जे ऐकलं होतं ते असं की, सिनेमाच्या वेळेला रंजू ताईचा अपघात झालेला. जेव्हा अशा काही गोष्टी घडतात, तेव्हा प्रोड्युसर किंवा इतर त्यांची ती जबाबदारी असते. तोपर्यंत तिचे बरेचसे ऑपरेशन्स झाले होते आणि मग शांताराम बापू गेले. त्यानिमित्तानं मी तिची मुलाखत घ्यायला गेले होते. पहिल्याच भेटीत तिचा आणि माझा छान रॅपो जमला. खूप उत्तम अभिनेत्री होती ती. ती जाईपर्यंत तिचं आणि माझं कनेक्शन होतं. ती मला अशोक मामांबद्दल सांगायची. त्यामुळे तिला अशा अवस्थेत बघणं आपल्यासाठी त्रासदायक होतं.’

‘तिच्या चेहऱ्याला काही झालं नव्हतं. बाकी शरीर पॅरेलाईज्ड झालेलं. तिचा हात गळालेला. जेव्हा तिचा अपघात झाला तेव्हा जवळपास १०-१२ फूट अंतरावर तिचा हात पडला होता. ती स्वतःचा हात सरकत सरकत जाऊन घेऊन आलेली. पण ती खूप जिद्दी होती. त्यांच्याघरी कॉर्डलेस फोन असायचा, तो तिला कानाला लावायला ५ मिनिटं लागायची. मला ती सांगायची, मी परत येणार आणि तिनं शेवटी एका नाटकात काम केलं.’ असं अनिता यांनी शेवटी सांगितलं. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत अनिता पाध्ये बोलत होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us