Nana Patekar : देहाचा प्रवास संपला, पण तुमच्या कर्मांचा…नाना पाटेकरांच्या जवळच्या व्यक्तीची पोस्ट

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या जवळच्या व्यक्तीनं त्यांच्या पुण्यातील 'नानाची वाडी'चा फोटो शेअर करत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Nana Patekar : देहाचा प्रवास संपला, पण तुमच्या कर्मांचा...नाना पाटेकरांच्या जवळच्या व्यक्तीची पोस्ट
| Updated on: Oct 21, 2026 | 5:07 PM

दिवंगत मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं असून त्यांच्या निधनानं कलाविश्वावर आणि कुटुंबियांवर दुःखचा डोंगर कोसळला आहे. नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी निधन झालं. नाना पाटेकर यांचं कार्य त्यांच्या पुण्यातील फार्महाऊसवर कार्य करण्यात आलं. त्याचा एक फोटो नाना पाटेकर यांचा पुतण्या सचिन पाटेकरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सचिन पाटेकरनं डोणजे येथील ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसमधील नानंच्या कार्याचा फोटो शेअर केला असून भावूक कॅप्शन लिहिलं आहे. ‘या घरात या कार्यासाठी येईन, असं ध्यानी मनी न्हवतं. का रे काका असा वागलास? असा निघून गेलास, देवा तू इतका कसा निष्ठूर झालास रे’ असं कॅप्शन सचिनने लिहिलं आहे. या फोटोवर सचिनने ‘देहाचा प्रवास संपला, पण तुझ्या कर्मांचा प्रकाश कधीच संपणार नाही’ असं कॅप्शन लिहिलं आहे. तसेच हा फोटो शेअर करत सचिनने बॅकग्राउंडला नाना पाटेकर यांच्या आवाजातील ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’ ही भावूक कविता लावली आहे.

Loading...

नाना पाटेकर यांची कविता

गेले द्यायचे राहून,
तुझे नक्षत्रांचे देणे;
माझ्यापास आता कळ्या,
आणि थोडी ओली पाने.

आलो होतो हासत मी,
काही श्वासांसाठी फक्त;
दिवसांचे ओझे आता,
रात्र-रात्र सोशी रक्त.

आता मनाचा दगड,
घेतो कण्हत उशाला;
होते कळ्यांचे निर्माल्य,
आणि पानांचा पाचोळा.

 

 

 

 

 

दरम्यान, नाना पाटेकर यांना ८ ऑक्टोबर रोजी पहाटे त्यांच्या गोव्यातील घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर दिला. परंतु त्यांना वाचवता आलं नाही. पुणे येथील डोंजेमधील फार्महाऊसवर संपूर्ण शासकीय सन्मानानं नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोस्टमार्टममध्ये नाना पाटेकर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं घोषित करण्यात आलं. अहवालात म्हटलं आहे की, हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us