Sachin Pilgaonkar : आई-वडिलांसारखी माया केली, लाडात वाढवली, तिनंच केला विश्वासघात; सचिन पिळगांवकरांसोबत घडलेला धक्कादायक प्रकार

Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकर यांनी एका मुलीला दत्तक घेतलेलं. तिनं सचिन यांचा विश्वासघात केलेला.

Sachin Pilgaonkar : आई-वडिलांसारखी माया केली, लाडात वाढवली, तिनंच केला विश्वासघात; सचिन पिळगांवकरांसोबत घडलेला धक्कादायक प्रकार
| Updated on: Oct 19, 2026 | 5:57 PM

सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या मुलीचं नाव श्रिया असून त्यांनी एका मुलीला दत्तकही घेतलेलं. पण, नंतर तीच त्यांना सोडून गेली. श्रियाच्या जन्माच्या एक–दोन वर्षे आधी सचिन यांनी या मुलीला दत्तक घेतलेलं. पण, ती मुलगी मोठी झाली अन् तिनं सचिन आणि सुप्रिया यांच्यावर आरोप केले होते. एका मुलाखतीदरम्यान सचिन यांनी त्या मुलीचा उल्लेख केला होता. करिष्मा मखानी असं या मुलीचं नाव असून ती चांगल्या घरातील मुलगी होती. तिचे वडील लंडनमधील एका रेस्टॉरंटचे मालक होते. पण त्यांची पत्नी म्हणजेच करिष्माची आई सतत आजारी असायची. करिष्माचे वडील आणि सचिन यांच्यात चांगली मैत्री होती. करिष्माच्या वडिलांनी तिला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, हे सचिन आणि सुप्रिया यांना पटलं नाही.

सचिन आणि सुप्रिया यांनी मुलीला घेतलेलं दत्तक

Loading...

सचिन यांनी करिष्माला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी करिष्मा तीन–चार वर्षांची होती. सचिन आणि सुप्रिया यांनी करिष्माचं उत्तम पालनपोषण केलं, तिला लाडाकोडात वाढवलं. तसेच सचिन यांनी करिष्माला इंडस्ट्रीत कामही दिलं. मात्र, एके दिवशी करिष्माचे वडील अचानक मुंबईत आले आणि तिला लंडनला घेऊन दिले. या सगळ्याचा सचिन यांना मोठा धक्का बसला. सचिन यांनी करिष्माच्या वडिलांवर किडनॅपिंगचा आरोप केला. पण, एका मुलाखतीत करिष्मा म्हणालेली की, ‘ते माझे वडील होते, मी त्यांच्यासोबत गेले, किडनॅपिंगचा काही प्रश्न नाही.’

काही वर्षानंतर करिष्मा इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मुंबईत आली. तिनं सचिन आणि सुप्रिया यांच्याकडे मदत मागितली. दोघांनीही तिला मोठ्या मनानं माफ केलं. सहा–सात महिने करिष्मा सचिन आणि सुप्रिया यांच्यासोबत राहत होती. पण, इंडस्ट्रीत तिचं नाव फारसं चाललं नाही. त्यानंतर करिष्मानं पुन्हा लंडनची वाट धरली.

दरम्यान, सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. जिला आई–वडिलांचं प्रेम दिलं, तिनेच आमच्यावर गंभीर आरोप केले. ज्याला मित्र मानलं त्यानेच आमची आर्थिक फसवणूक केली, असं सचिन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us