समंथाच्या आजाराविषयी कळताच नाग चैतन्यचं कुटुंब चिंतेत; नागार्जुनच्या मुलाने दिली साथ

| Updated on: Oct 31, 2022 | 7:22 PM

समंथाला 'मायोसिटिस'चं निदान; परदेशात उपचार सुरू

समंथाच्या आजाराविषयी कळताच नाग चैतन्यचं कुटुंब चिंतेत; नागार्जुनच्या मुलाने दिली साथ
समंथाच्या आजाराविषयी कळताच नाग चैतन्यचं कुटुंब चिंतेत
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला मायोसिटिस या आजाराचं निदान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती परदेशात उपचार घेत आहे. रविवारी यासंदर्भातील पोस्ट लिहित समंथाने चाहत्यांना आजाराविषयीची माहिती दिली. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी यांनीसुद्धा पोस्ट लिहित समंथाला आधार देण्याचा प्रयत्न केला. आता समंथाचा पूर्वाश्रमीचा पती नाग चैतन्यच्या कुटुंबातील एका सदस्याने तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

नागार्जुन यांचा दुसरा मुलगा आणि नाग चैतन्यचा भाऊ अखिल अक्कीनेनी याने समंथासाठी पोस्ट लिहिली आहे. ‘प्रिय सॅम, तुला खूप सारं प्रेम आणि परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शक्ती मिळो’, अशी पोस्ट अखिलने लिहिली.

हे सुद्धा वाचा

समंथाला बॉलिवूडमधूनही बरीच साथ मिळाली आहे. कियारा अडवाणी, कृती सनॉन, जान्हवी कपूर, राशी खन्ना, वरूण धवन यांसारख्या कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


समंथाने 2017 मध्ये नाग चैतन्यशी लग्नगाठ बांधली होती. चार वर्षांच्या संसारानंतर 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. लग्नापूर्वी काही वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते.

‘मायोसिटिस’ या दुर्मिळ आजाराने समंथाला ग्रासलं आहे. या ऑटोइम्युन हेल्थ कंडिशनवर मात करण्यासाठी समंथा सध्या परदेशी उपचार घेत आहे.

मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये जळजळ होते. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.